जयसिंगपूर : शिवसेना व यड्रावकर गटाच्या 88 जणांवर गुन्हे दाखल

(political news) जयसिंगपूर येथे सोमवारी शिवसेना पक्षाच्या वतीने बंडखोर आमदारांच्या निषेधार्थ कोणत्याही परवानगीविना बेकायदेशीर जमाव जमवून, घोषणाबाजी करीत मोर्चा काढून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण केल्या प्रकरणी शिवसेना व यड्रावकर गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते अशा 88 जणांवर जयसिंगपूर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

यात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव (रा. हुपरी), उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील (रा. सैनिक टाकळी), जि.प.च्या माजी समाजकल्याण सभापती स्वाती सासणे (रा. उदगाव), शिरोळ तालुका अध्यक्ष वैभव उगळे (रा. कुरुंदवाड), शहराध्यक्ष तेजश कुराडे-देशमुख (रा.जयसिंगपूर), बाबासाहेब सावगांवे (रा. कुरुंदवाड), माजी तालुका प्रमुख सतिश मलमे (रा. दानोळी), सतीश पवार, आकाश शिंगाडे, राजेंद्र पाटील, प्रतीक धनवडे (रा. नृसिंहवाडी), मलकारी लवटे (इचलकरंजी), अर्जुन जाधव (हुपरी), पिंटू मुधाळे (हुपरी), मनीषा पवार (संभाजीपूर), साजिदा घोरी (जयसिंगपूर), सयाजी चव्हाण व भारत पवार (दोघे इचलकरंजी) यांच्यासह 43 जणांवर जयसिंगपूर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबातची फिर्याद पोलिस विजय बाबूराव पाटील यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली आहे. (political news)

तर यड्रावकर गटाचे जयसिंगपूरचे माजी उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, माजी नगरसेवक संभाजी मोरे (जयसिंगपूर), दरशथ काळे (अब्दुललाट), राजकुमार पाटील, सागर माने, गुंडाप्पा पवार, विनायक गायकवाड, गणेश चौगुले, बबलू रसाळ, विजय मोरे, प्रकाश लठ्ठे, राजेश चुडाप्पा, बंडू भवरे, प्रकाश पवार, अमृत तावदारे यांच्यासह 30 जणांवर गुन्हे जयसिंगपूर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबतची फिर्याद पो.कॉ. संदेश शेटे यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *