डी के टी ई संस्थेच्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यीनींची जी ई एव्हीएशन पुणे या नामांकित कंपनीत निवड
इचलकरंजी येथील डी के टी ई सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यीनींची जी ई एव्हीएशन पुणे या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक च्या तृतीय वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधील वैभवी बाबर आणि साक्षी क्षिरसागर या विद्यार्थ्यीनींची अभिनंदनीय निवड झाली आहे.
जी ई एव्हीएशन ही कंपनी पुणे स्थित असून स्थानिक उत्पादन सुविधा आणि पाच तंत्रज्ञान केंद्रासह जी ई आज अर्थ व्यवस्थेतील काही महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये काम करते. विमान वाहतूक. उर्जा. अक्षय उर्जा आणि आरोग्य सेवा देते. राष्ट्रनिर्मितीमध्ये गुंतलेली एक जागतिक कंपनी आहे. या विद्यार्थ्यांची झालेली निवड म्हणजे तांत्रिक शिक्षणातील गुणवत्ता व दर्जा याचा परिपाक आहे. दर्जेदार तंत्र शिक्षणाबरोबरच उत्कृष्ट प्लेसमेंटची परंपरा पॉलिटेक्निकने स्थापनेपासूनच जोपासली असल्याचे मनोगत मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांनी व्यक्त केले.
येथे घडणारा प्रत्येक विद्यार्थी हा शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच उद्योगांना आवश्यक असणाऱ्या गुणवत्तेने परिपूर्ण असणारा अशाप्रकारचा प्लग इन सोल्युशन आहे. यामुळेच तंत्र शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सातत्याने नामांकित कंपनीमध्ये निवड होत असल्याचे पॉलिटेक्नीकचे प्राचार्य प्रा. अभिजित कोथळी यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या या निवडीने पॉलिटेक्निकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवल्याचे त्यांनी नमूद केले. डी के टी ई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, सर्व संचालक मंडळानचे बहुमोल सहकार्य लाभले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना टेक्सटाईल ॲण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयुटचे कार्यकारी संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. अभिजीत कोथळी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक एम.बी. चौगुले, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, प्राध्यापिका वृंद यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे. विद्यार्थ्यांच्या या निवडीबद्दल समाज्याच्या सर्वच स्तरांतुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.