UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी खूशखबर!
UPSC परीक्षेची (exam) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी खूशखबर आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने एक Android मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केले आहे, जे लोकांना UPSC परीक्षा आणि भरतीशी संबंधित माहिती प्रदान करेल. UPSC अॅप अँड्रॉइड फोनसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे आणि ते Google Play store वरून डाउनलोड केले जाऊ शकते.
अधिकृत निवेदनानुसार, केंद्रीय लोकसेवा आयोगाने गुगल प्लेस्टोअरवर UPSC अँड्रॉइड अॅप सादर केले आहे, ज्याद्वारे परीक्षा आणि भरतीशी संबंधित सर्व माहिती मोबाईलवर मिळू शकते. हे अॅप मोबाईलवर अर्ज भरण्याची आणि सबमिट करण्याची सुविधा देणार नाही.
नागरी सेवा परीक्षा तीन टप्प्यात
आम्ही तुम्हाला सांगतो की UPSC केंद्र सरकारच्या नोकऱ्यांसाठी प्रतिष्ठित नागरी सेवा परीक्षेसह अनेक परीक्षा (exam) घेते. दरवर्षी हजारो उमेदवार या परीक्षांसाठी अर्ज करतात. भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय विदेश सेवा (IFS) आणि भारतीय पोलीस सेवा (IPS) साठी अधिकारी निवडण्यासाठी नागरी सेवा परीक्षा दरवर्षी तीन टप्प्यांत (प्राथमिक, मुख्य आणि मुलाखत) घेतली जाते.
अशी क्रॅक करा परीक्षा
चुका करू नका
तुम्ही जर एकदा UPSC परीक्षेला बसला असाल तर तुम्हाला पेपर आणि इतर गोष्टींची कल्पना आली असेल. त्यामुळे आता तुमच्या चुकांमधून धडा घ्या आणि त्यांची पुनरावृत्ती टाळा (UPSC Preparation Tips 2022). मॉक टेस्ट मध्ये झालेल्या चुकांकडे विशेष लक्ष द्या. जर तुम्ही तुमच्या चंगूकांमधून शिकलात तर पुन्हा ती चूक कधीच होणार नाही.
करंट अफेयर्स महत्त्वाचे
यूपीएससी परीक्षेत करंट अफेयर्सची माहिती खूप उपयुक्त आहे. त्यामुळे रोज वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावा. त्यात येणारा संपादकीय स्तंभ तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल. तसेच, परीक्षेत पर्यायी विषय हुशारीने निवडा.