मोठ्या बहिणीने विष पिवून तर लहान बहिणीने गळफास घेवून केली आत्महत्या

प्रतिनिधी:- विजय पाटील

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तरुणींच्या आत्महत्या सुरुच आहे. आता करवीर तालुक्यातील वयाची पंचवीशी सुद्धा पार न केलेल्या एकुलत्या एक मुलीने आत्महत्या केली आहे.कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तरुणींच्या आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. आता करवीर तालुक्यातील वयाची पंचवीशी सुद्धा पार न केलेल्या एकुलत्या एक मुलीने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच तरुणीच्या मोठ्या बहिणीने सुद्धा दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यामुळे दुर्दैवी आई वडिलांना मुलीच्या अशा निर्णयाने निराधार होण्याची वेळ आली आहे.

करवीर तालुक्यातील बीडशेडमध्ये सानिका सर्जेराव सातपुते (वय 24) या तरुणीने मंगळवारी पहाटे राहत्या घरीच ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. एकुलत्या एक असलेल्या लेकीने उचललेल्या टोकाच्या पाऊलाने आई वडिल मुळापासून हादरून गेले आहेत. दोन मुलींनी आत्महत्या केल्याने सातपुते कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. वडिल सर्जेराव सातपुते सानिका न उठल्याने पाहण्यासाठी गेले असता सानिका आत्महत्या केलेल्या स्थितीत आढळून आली. सर्जेराव सातपूते यांनी बीडशेडमध्ये जागा घेऊन घर बांधले होते. एक महिन्यांपूर्वीच त्यांनी वास्तूशांती केली होती. मात्र, मुलीने त्याच घरात आत्महत्या केली.

दोन्ही मुलींकडून आत्महत्येने शेवट झाला. मोठी मुलगी असलेल्या ऋतुजाने सुद्धा आत्महत्या करून आयुष्य संपवले होते. तिने विष पिऊन आत्महत्या केली होती. याचा विसर पडत नाही तोवर दुसऱ्या मुलीने टोकाचे पाऊल उचलले आहे. मामा वारल्यानंतर नैराश्यात भाचीने केला आयुष्याचा शेवट दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील कोडोली साखरवाडीत मामाच्या झालेल्या मृत्यूच्या नैराश्यातून भाचीने आत्महत्या केल्याची घटना घडली. श्रद्धा धर्मेंद्र कांबळे (वय 24) असे त्या तरुणीचे नाव आहे. धर्मेंद्र कांबळे यांना श्रद्धा एकूलती एक मुलगी होती. तिने मॅकेनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा करून पुण्यात एका कंपनीमध्ये कार्यरत होती. मामा संचित कांबळे (उदगाव, ता. शिरोळ) यांच्या निधनानंतर श्रद्धा नैराश्यात गेली होती. या नैराश्यात असतानाच श्रद्धाने दुसऱ्या मजल्यावरील पंख्याच्या हुकाला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. दुपारी दुसऱ्या मजल्यावर श्रद्धाला जेवण्यासाठी हाक मारण्यासाठी घरातील सदस्य वर गेला असता श्रद्धाने आत्महत्या केल्याचे लक्षात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *