कोल्हापूर जिल्हा जैन प्रकोष्ट उपाध्यक्षपदी जयपाल काणे यांची निवड.
टाकळीवाडी:- नामदेव निर्मळे
टाकळीवाडी.तालुका:- शिरोळ येथील भारतीय जनता पार्टी टाकळीवाडी शाखा अध्यक्ष मा.जयपाल काणे यांची जैन प्रकोष्ट जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.तसेच जैन प्रकोष्ट अध्यक्षपदी महावीर तकडे यांची निवड करण्यात आली.
भारतीय जनता पार्टीचे जैन प्रकोष्ट राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.संदीप भंडारे साहेब व मा. सुनील ओरा जैन प्रकोष्ट कोल्हापूर शहराध्यक्ष यांच्या हस्ते निवडीचे पत्र मिळाले. यावेळी तालुक्यातील सन्माननीय सर्व जैन बांधव उपस्थिती होते.
निवड झाल्याबद्दल सत्कार करताना टाकळीवाडी चे (प्रगतशील शेतकरी) प्रकाश गोरवाडे, दत्तवाड गावचे (प्रगतशील शेतकरी) अभय शिदनाळे, संजय कुंभार (वीट उद्योजक )यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. सर्वत्र कौतुक होत आहे.