देशमुख, मलिक आणि राऊतांना का अटक केली? शरद पवार स्पष्टच बोलले

‘ज्या कामासाठी त्यांना आत टाकले त्यामुळे काही सापडले नाही, हा निष्कर्ष कोर्टाने काढला. एक घाबरवून सोडण्याचे काम झालं. अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊत यांना अटकेसाठी सत्तेचा गैरवापर झाला’ अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

100 कोटी वसुली प्रकरणामध्ये अनिल देशमुख जामिनावर बाहेर आले आहे. याच मुद्यावर शरद पवार यांनी परखड भाष्य केलं असून भाजपवर टीका केली आहे.

‘अनिल देशमुख यांच्या बाबतीत असेल, नवाब मलिक असतील किंवा संजय राऊत  यांच्या बाबतीत असेल, जामिनीवर कोर्टाने भूमिका घेतली जे आरोप केले होते, त्यात काहीही तथ्य आढळून आले नाही. ज्या कामासाठी त्यांना आत टाकले त्यामुळे काही सापडले नाही, हा निष्कर्ष कोर्टाने काढला. एक घाबरवून सोडण्याचे काम झालं. अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊत यांना अटकेसाठी सत्तेचा गैरवापर झाला, अशी टीका शरद पवारांनी भाजपवर केली.

‘केंद्र सरकारचे अधिवेशन झालचं नाही. विरोधकांना बोलू द्यायचं नाही अशी केंद्राची भूमिका आहे. सभागृहात गोंधळ करायचा आणि विधेयक मंजूर घ्यायची हे सरकारची भूमिका आहे. हे चित्र या आधी कधी झालं नाही. हे किती दिवस चालणार काय माहित. याचा विचार आम्हा विरोधकांना बसून करावा लागेल, अशी टीकाही पवारांनी केली.

‘एक नवीन चित्र उभे रहात आहे. 56 ते 60 टक्के लोक शेतीवर अवलबून आहेत. चांगला पाऊस झाला, क्रय शक्ती वाढली. त्यामुळे शेतकरी यशस्वी होईल व्यापार आणि उद्योग या क्षेत्रात चागले दिवस यायाला पाहिजे. भारत हा निर्यातदार देश होऊ शकतो. अर्थव्यवस्थासाठी सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे. सत्तेवर कुणी असेल तरी अर्थव्यवस्था सुधारावी लागेल. राजकीय हेवे दावे बाजूला ठेवून अर्थव्यवस्थवर काम केले पाहिजे, असंही पवार म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *