अयोध्येतील राम मंदिर परिसर बॉम्बने उडवून देण्याची धमकी

अयोध्येतील राम जन्मभूमी संकुल Ram Mandir Ayodhya बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर अयोध्या परिसरात पोलिस सतर्क झाले आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व पोलिस कर्मचा-यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. अयोध्येतील एका रहिवाशाला एका अज्ञात व्यक्तीचा कॉल आला होता. त्याने राम मंदिर परिसर उडवून देण्याची धमकी या व्यक्तीला दिली. त्याने ही माहिती तात्काळ पोलिसांना कळवली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या एका जिल्ह्यातील रामकोट परिसरात राहणा-या मनोज नावाच्या व्यक्तीला हा फोन आला होता. मनोज हा रामलल्ला सदनाचा एक शिष्य आहे. त्याच्या मोबाईलवर आलेल्या कॉलची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्याला गुरुवारी सकाळी 10 वाजता एका अज्ञात व्यक्तीकडून कॉल आला होता. त्याने कॉलवर राम जन्मभूमी संकूल परिसर Ram Mandir Ayodhya उडवून देण्याची धमकी दिली. त्यानंतर मनोजने पोलिसांना ही माहिती कळवली.दरम्यान, ही माहिती मिळताच पोलिसांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी तैनात असलेल्या सर्व कर्मचा-यांना अलर्ट जारी केला आहे. तसेच राम जन्मभूमी पोलिस स्टेशनचे स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) संजीव कुमार सिंह यांनी सांगितले की त्यांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे आणि चौकशी सुरू आहे. कॉलवरून धमकी देणा-या या अज्ञात व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहे, असेही ते म्हणाले. यासंबंधी अयोध्या पोलिसांकडून त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर व्हिडिओ ट्विट करून याची माहिती दिली आहे. Ram Mandir Ayodhya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *