राहुल गांधी पंतप्रधान होतील का? संजय राऊत म्हणाले…

लोकसभा निवडणुकीत भाजपला देशातील जनतेने नाकारले आहे. ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपला केवळ २४० जागांवर समाधान मानावे लागले आहे. हा नरेंद्र मोदी यांचा नैतिक पराभव आहे. राहुल गांधी यांनी नेतृत्व सिद्ध केले आहे. ते देशाचे नेते आहेत. ते पंतप्रधान झाले तर आमचा पाठींबा असेल, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि.५) माध्‍यमांशी बाेलताना स्पष्ट केले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.

काय म्हणाले संजय राऊत?

  • लोकसभा निवडणुकीत भाजपला देशातील जनतेने नाकारले
  • आपण देव नाही मनुष्य आहोत हे मोदींनी मान्य करावे
  • मोदीजींची गॅरंटी मोदींनीच संपवली.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज माध्‍यमांशी बाेलताना संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधी हे देशाचे नेते आहेत. ते पंतप्रधान हाेणार असतील तर आमचा पाठिंबा आहे. मोदींनी आपला पराभव मान्य करावा, त्यांनी त्यांचीच गॅरंटी संपवली आहे,. देशातील जनतेने त्यांना नाकारले आहे, आपण देव नाही मनुष्य आहोत हे त्यांनी मान्य करावे, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. Lok Sabha Election 2024

… तर इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत येईल

जनतेने इंडिया आघाडीला निवडून दिले आहे.  देशात हुकूमशाही हवी की लोकशाही हे नितीश कुमार आणि चंद्राबाबू  नायडू यांनी ठरवावे. ते मोदींसोबत जाणार नाहीत. नितीश कुमार आणि चंद्राबाबू  नायडू सोबत आले तर इंडीया आघाडीच सरकार येईल असही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *