कुपवाड एमआयडीसीतील कंपनीस आग
कुपवाड एमआयडीसीतील राजधानी युनिव्हर्सल फॅब्रिक्स प्रा.लि. या कंपनीत शॉर्टसर्किटने आग (fire) लागली. आगीत तयार कपडे, फर्निचर, इलेक्ट्रिकल उपकरणे, कागदपत्रे असे लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. महापालिका व एमआयडीसी अग्निशमन विभागाच्या सहाय्याने जवानांनी चार तासानंतर आग आटोक्यात आणली. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. कुपवाड पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.
सोमवारी दुपारी कंपनीच्या दुसर्या मजल्यावर शॉर्टसर्किटमुळे आग (fire) लागली. कंपनी व्यवस्थापनाने तातडीने आगीची माहिती सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका व कुपवाड एमआयडीसी अग्निशमन विभागाला दिली. दोन्ही अग्निशमन विभागाचे अधिकारी व जवानांनी तीन बंबाच्या सहाय्याने चार तासानंतर आग आटोक्यात आणली. आगीत वातानुकूलित मशिनरी, फर्निचर, तयार वस्तू, सुटे भाग जळून खाक झाले. तयार रेडिमेड शर्ट, एचआयव्ही सर्जिकल किट्स, फर्निचर फिक्स्चर, इलेक्ट्रिकल उपकरणे आणि फिटिंग्ज, कंपनीची कागदपत्रे अर्धवट जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कंपनीच्या व्यवस्थापनाने व्यक्त केला. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.