सांगलीतील शाळेनं राबवला भन्नाट उपक्रम!

कोविडच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा बंद होत्या. तसेच लॉकडाऊन मुळे शहरी भागातील बहुतांश मुलेही घरातच बंदिस्त होती. बाहेर खेळण्याच्या वयात मुले घरात बंदिस्त झाली. मुलांमध्ये शारीरिक व मानसिक समस्या निर्माण होण्याची शक्यता होती. याबाबीचा विचार करून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (SCERT) अनोख्या उपक्रमाचे (activity) आयोजन केले आहे. SCERT च्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आता खेळाची मेजवानी मिळत आहे.

सांगलीतील तासगाव तालुक्यात शिरगांव (क) च्या जिल्हा परिषद शाळेत अनोखा उपक्रम राबविण्यात आला. शिक्षिका वासंती अनिल कोदांडे (खेराडकर) यांनी SCERT चा हा उपक्रम शाळेत राबविला. एटीएम संस्थेच्या वतीने सहज शिकू आनंदे, लर्न विथ फन ही संकल्पना आमलात आणली. दर शनिवारी हा उपक्रम घेण्यात येत होता. त्यामुळे विद्यार्थी शनिवारची वाट पाहत असत आणि त्यांना या उपक्रमाची उत्सुकता लागून राहते.

या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी (activity) ATM चे राज्य संयोजक विक्रम अडसूळ व ज्योतीताई बेलवले, प्राचार्य रमेश होसकोटी , नवोपक्रम विभाग प्रमुख प्रा. डॉ. राजेंद्र भोई, डॉ. वैशाली भोई यांचे मार्गदर्शन लाभले. गटाशिक्षणाधिकारी आबासो लावंड, सुधा पाटील, भारत बंडगर, सुरेखा राजगे, मुख्याध्यापक नेताजी कांबळे, मारुती थोरात, सर्व शिक्षक वृंद, शाळेतील विद्यार्थी व पालक यांचे सहकार्य लाभले. शाळेतील सर्व विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *