डी.के.टी.ई. संस्थेच्या आय.टी.आय. च्या कॅम्पस मध्ये १७१ विद्यार्थ्यांची निवड

इचलकरंजी  येथील डी.के.टी.ई. संस्थेच्या पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील आय.टी.आय. च्या वतीने नुकतेच कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यातील समाविष्ट कंपन्यांनी १७१ विद्यार्थ्यांची इंटरशिप व जॉबसाठी नियुक्ती केली आहे. यापैकी डी.के.टी.ई. आय.टी.आय. च्या ४२ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
या वर्षी डी.के.टी.ई. संस्थेच्या आय.टी.आय. च्या वतीने सदरच्या कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लुकास टीव्हीएस लि. चाकण, वॅरॉक इंजिनिअरिंग लि. चाकण, टेनेको क्लीन एअर इंडिया प्रा. लि. चाकण व टाटा मोटर्स क्वेस कार्पोरेशन पुणे या नामांकित कंपन्यांचा सहभाग होता.


तांत्रिक फेरी व एच आर मुलाखत या निकषांच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड केली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना डी.के.टी.ई. संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे व सर्व संचालक मंडळाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. ए. पी. कोथळी, आय.टी.आयचे प्राचार्य डी. डी. पाटील, पॉलिटेक्निकचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक एम. बी. चौगुले, आय.टी.आयचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर व्ही. आर. मुल्लाणी व सर्व निदेशक यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे.
विद्यार्थ्यांच्या या निवडीबद्दल समाज्याच्या सर्वच स्तरांतुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *