दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पोस्ट विभागात बंपर ओपनिंग्स; ‘या’ पदासाठी भरती प्रक्रिया सुरू
वाहन चालवण्याचा अनुभव आणि वाहनातील किरकोळ बिघाड दुरुस्त करण्याची माहिती असणाऱ्या व्यक्तींना पोस्ट विभागात नोकरीची (job) चांगली संधी आहे. पोस्ट विभागाने स्टाफ कार ड्रायव्हर (सामान्य श्रेणी) पदासाठी पात्र आणि इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या पदासाठी इयत्ता 10 वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. होमगार्ड किंवा नागरी स्वयंसेवक म्हणून काम केलेल्या उमेदवारांना या पदासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. या पद भरती प्रक्रियेतून स्टाफ कार ड्रायव्हरची (सामान्य श्रेणी) चार पदं भरली जाणार आहेत. या पदावरील नियुक्ती तीन वर्षांसाठी असेल. उमेदवाराला या पदासाठी ऑफलाइन अर्ज करावा लागेल. पोस्ट विभागाने या पदासाठी काही शैक्षणिक निकष ठरवले आहेत. `स्टडी कॅफे डॉट इन`ने याविषयीची माहिती दिली आहे.
पोस्ट विभागात स्टाफ कार ड्रायव्हर (सामान्य श्रेणी) या पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहेत. यासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवार ऑफलाइन अर्ज करू शकतात. अर्जासाठी अंतिम मुदत 30 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या संदर्भात पोस्ट विभागाने अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. नियुक्तीचा कार्यकाळ तीन वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्ती/अॅब्सॉर्बशन बेसिसवर असेल.
पोस्ट विभागाच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, स्टाफ कार ड्रायव्हर (सामान्य श्रेणी) पदासाठी इच्छूक उमेदवार इयत्ता 10 वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराकडे मोटर कार ड्रायव्हिंगचं वैध लायसन्स असावं. तसंच त्याला मोटर मॅकेनिझमची माहिती ( उमेदवार वाहनातील किरकोळ दोष दूर करण्यास सक्षम असावा) असावी. तसेच उमेदवाराला किमान तीन वर्षे मोटर कार चालविण्याचा अनुभव असावा. उमेदवारांनी होमगार्ड किंवा नागरी स्वयंसेवक म्हणून तीन वर्षे सेवा केलेली असेल तर त्यास प्राधान्य दिले जाईल. नमूद केलेल्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 56 वर्षांपेक्षा जास्त नसावे. स्टाफ कार ड्रायव्हर (सामान्य श्रेणी) पदावर निवड झालेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्सच्या लेव्हल-2 नुसार मासिक वेतन (19,900 ते 63,200) दिलं जाईल. (job)
पोस्ट विभागाच्या अधिसूचनेनुसार, या पदासाठी पात्र आणि इच्छूक उमेदवारांनी पोस्ट विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज डाउनलोड करून घ्यावा. डाउनलोड केलला अर्ज सविस्तर माहितीसह भरून तो वेबसाईटवर दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. अर्जासाठीची अंतिम मुदत 30 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी स्टाफ कार ड्रायव्हर (सामान्य श्रेणी) या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी पोस्ट विभागाने जारी केलेली अधिसूचना काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे.