‘या’ मंत्रालयात थेट भरतीची घोषणा; जाणून घ्या पगार आणि पात्रतेच्या अटी
कायदा आणि न्याय मंत्रालयात रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदाचे नाव कॉपी होल्डर आहे. प्रतिनियुक्ती/कायम करणे या आधारावर उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. 25 मे 2023 रोजी या संदर्भात जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. उमेदवार या तारखेपासून पुढच्या 60 दिवसांत अर्ज करू शकतात. या पदासाठी शैक्षणिक पात्रता, रिक्त जागा, अर्ज कसा करायचा, वेतन किती असेल व वयोमर्यादा काय आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. (job alert)
पदाचं नाव व रिक्त जागा
कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, कायदा आणि न्याय मंत्रालयात कॉपी होल्डर पदासाठी प्रतिनियुक्ती/कायम करणं या आधारावर दोन रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. कामाचं ठिकाण नवी दिल्ली असेल.
पगार
पे लेव्हल: दुसऱ्या पे मॅट्रिक्समध्ये 7 व्या सीपीसीनुसार प्रतिनियुक्ती/कायम करणं या आधारावर 19,900 ते 63,200 वेतन दिलं जाईल.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्यांचे कमाल वय 56 वर्षं असावं.
पात्रता
विशेष आवश्यकता: केंद्र सरकार, डिफेन्स फोर्सेस, सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन, राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश प्रशासनाअंतर्गत अधिकारी ज्यांनी – (job alert)
– भारत सरकारच्या प्रेसमध्ये किंवा कोणत्याही मंत्रालयात, विभागात नियमितपणे समान पदावर काम केलंय असे उमेदवार अर्ज करू शकतात.
महाराष्ट्रात मेगाभरतीची घोषणा! ‘या’ पदांसाठीच्या तब्ब्ल 2,384 जागांवर मिळणार सरकारी नोकरी; तुम्ही आहात का पात्र?
– कायदा व न्याय मंत्रालयामध्ये नियमित आधारावर ग्रुप ‘सी’ पदावर काम करणारे कर्मचारी (सफाई कामगार) अर्ज करू शकतात. त्यांना कॉम्प्युटर हाताळण्याचे ज्ञान असावे.
शैक्षणिक पात्रता
– कोणत्याही योग्य मान्यताप्राप्त बोर्ड किंवा प्री-युनिव्हर्सिटी/इंटर-कॉलेजमधून 12 वी उत्तीर्ण
– इंग्रजीमध्ये किमान 35 शब्द प्रतिमिनिट टाइप करता यायला हवे.
इतर पात्रता
– कोणत्याही प्रेसमध्ये किंवा कोणत्याही वृत्तपत्र कार्यालयात इंग्रजी कॉपी-होल्डिंग किंवा प्रूफ-रीडिंग कामाचा अनुभव.
– हिंदी भाषा यावी.
निवड प्रक्रिया
उमेदवाराची निवड प्रतिनियुक्ती/कायम करणं या आधारावर केली जाईल.
प्रतिनियुक्तीचा कालावधी: केंद्र सरकारच्या इतर संस्था किंवा विभागांमध्ये या नियुक्तीच्या लगेच अगोदर झालेल्या दुसर्या एक्स कॅडर पोस्टवरील प्रतिनियुक्तीचा कालावधी तीन वर्षांपेक्षा जास्त नसावा.
अर्ज कसा करायचा
कायदा आणि न्याय मंत्रालयात कॉपी होल्डर पदासाठी इच्छुक असलेले पात्र उमेदवार योग्य चॅनेलद्वारे त्यांचे अर्ज दिलेल्या प्रो-फार्मामध्ये पाठवू शकतात. हे अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत करता येतील. अर्ज पाठवताना Shri. Uttam Prakash, Deputy Secretary (Administration), Legislative Department, Ministry of Law and Justice, Room No. 411, A-Wing, Shastri Bhawan, New Delhi 110 001 हा पत्ता त्यावर नमूद करावा.