सांगली जिल्हा परिषदेत 751 जागांची भरती
सांगली जिल्हा परिषदेतील सुमारे 751 जागांची भरतीसाठी (recruitment) जुलैच्या पहिल्या आठवड्यात पहिली जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेतील विविध पदे वर्षानुवर्ष रिक्त आहेत. त्यामुळे अनेक प्रशासकीय व विकासकामांसाठी अडचणी येत आहेत. अधिकार्यांची पदे रिक्त असल्याने संबंधितांचा पदभार प्रभारीकडे आहे. वरिष्ठ अधिकार्यांच्या जागेवर कायम अधिकारी नसल्याने अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते.
संवर्ग निहाय अंदाजे भरती होणारी आकडेवारी अशी ः 52 कंत्राटी ग्रामसेवक, 9 अंगणवाडी पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी (पंचायत) 1, आरोग्य सेवक (पु.) हंगामी फवारणीमधून 168, आरोग्य सेवक (पु.) 17, आरोग्य सेवक (म) 366, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 1, आरोग्य पर्यवेक्षक 4, औषध निर्माण अधिकारी 23, कनिष्ठ सहाय्यक (लि. ) 34, कनिष्ठ सहाय्यक (लेखा) 4, कनिष्ठ अभियंता (जलसंधारण) 7, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (जलसंधारण)3, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम) 20, कनिष्ठ अभियंता (बांधकाम) 3, कनिष्ठ आरेखक (बांधकाम) 1, कनिष्ठ अभियंता (ग्रापापु) 23, पशुधन पर्यवेक्षक 22, विस्तार अधिकारी (कृषी) 1, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) 2 अशी एकूण अठरा संवर्गाची अंदाजे 751 पदाची भरती (recruitment) होणार आहे.