आता ATM कार्डशिवाय काढता येणार पैसे, पण कसे? घ्या जाणून
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या करोडो ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. एसबीआयने आपल्या योनो (YONO) अॅपची अपग्रेड केलेली आवृत्ती लाँच केली आहे. या अपग्रेड केलेल्या अॅपमध्ये ग्राहकांना (customers) इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉलची (ICCW) सुविधा मिळेल. या अंतर्गत आता एसबीआयचे ग्राहक कोणत्याही बँकेच्या ATM मधून कार्ड न वापरता पैसे काढू शकणार आहेत. या सुविधेनंतर, एसबीआयचे ग्राहक आता कोणत्याही बँकेच्या एटीएममधून कार्डलेस पैसे काढू शकतात, म्हणजेच ग्राहकांना एटीएममधून पैसे डेबिट कार्ड वापरण्याची गरज पडणार नाही.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ‘YONO for Every Indian’ अॅपद्वारे ग्राहकांना UPI फीचर्स जसे की स्कॅन आणि पे, कॉन्टॅक्टद्वारे पे, रिक्वेस्ट मनी आणि इतर अनेक सुविधा मिळतील. या वर्षी मे महिन्यात, नवीन SBI खाती उघडण्यात आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे कर्ज वाटपाच्या संख्येत घट झाली आहे. एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले की, एसबीआय प्रत्येक भारतीयाला अत्याधुनिक डिजिटल बँकिंग सोल्यूशन्सद्वारे आर्थिक स्वावलंबन आणि सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे. ग्राहकांच्या अपेक्षा आणि सुरळीत डिजिटल बँकिंग अनुभव लक्षात घेऊन YONO अॅप अपग्रेड करण्यात आले आहे.
एटीएम कार्डशिवाय काढा पैसे
इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉल (ICCW) सुविधा लॉन्च केल्याने SBI ग्राहक UPI QR कॅश फीचर्सचा वापर करून कार्ड न वापरता कोणत्याही बँकेच्या ATM मधून पैसे काढू शकतात. सरकारी मालकीच्या बँकेने सांगितले की त्यांनी इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा सुरू केली असून या अंतर्गत एसबीआयचे ग्राहक (customers) आता कोणत्याही बँकेच्या ATM मधून त्यांचे कार्ड न वापरता पैसे काढू शकतील. आतापर्यंत एसबीआय फक्त एटीएममध्ये कार्डलेस पैसे काढण्याची सुविधा देत होती.
एसबीआयचे ६ कोटीहून अधिक योनो युजर्स
YONO अॅप २०१७ मध्ये लॉन्च झाल्यापासून देशातील सर्वात विश्वसनीय मोबाइल बँकिंग अॅप बनले आहे. त्याचे ६ कोटींहून अधिक नोंदणीकृत वापरकर्ते आहेत. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये YONO अॅपद्वारे ६४% किंवा ७८.६० लाख बचत खाती उघडण्यात आली.