RBI च्या नव्या नियमामुळं Debit, Credit कार्डचा वापर बदलणार

डेबिट आणि क्रेडिट किंवा या दोन्हींपैकी एक कार्ड (debit credit card) जरी तुम्ही वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण, आता याच कार्ड्सच्या वापरासंदर्भातील एक मोठी Update समोर आली आहे. थोडक्यात सांगावं तर आता डेबिट आणि क्रेडिट कार्ड तुम्ही कुठंही वापरू शकणार आहात.

रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार अमुक एका नेटवर्कवरच कार्ड चालेल ही अट आता शिथिल करण्यात आली असून, ते कोणत्याही नेटवर्कवर वापरता येणं शक्य होणार आहे. सदरील बदलांसंबंधीचा प्रस्तावही पुढे करण्यात आला असून, हा बदल 2023 च्या ऑक्टोबर महिन्यापासून लागू असेल.

सर्वसामानान्यांचं मत विचारात घेणार RBI

कार्डच्या (debit credit card) नेटवर्कसंदर्भातील बदलाच्या अनुषंगानं आरबीआयनं सर्वसामान्यांकडून त्यांची मतंही मागवली आहेत. कार्ड धारक आणि मर्चंट (दुकानदार) यांच्यामध्ये असणाऱ्या देवाणघेवाणीचा आणखी सुकर करण्यासाठी आरबीआयनं हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.

तुम्ही कधी खरेदीसाठी कुठं गेला असाल तर फाक क्वचितप्रसंगी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड काही ठिकाणांवर चालत नाही. कोणत्या दुकानावर खरेदीसाठी गेलं असता हा प्रकार घडताना दिसतो. कारण, काही क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड स्वाईप करण्याची मुभा ठराविक दुकानदारांनाच असते. प्रत्येक दुकानदारांना याची परवानगी नसल्यामुळं काही ठिकाणांवर VISA चं कार्ड चालतं तर काही ठिकाणी फक्त Mastercard. आता मात्र ही परिस्थिती बदलताना दिसणार आहे.

आता नेटवर्कही निवडता येणार

कार्डदात्या बँकेकडून कार्डधारक (खातेधारकांना) अनेक कार्ड नेटवर्कपैकी कोणताही एक पर्याय निवडण्यास सांगण्यात येईल. ज्यानंतर ग्राहकांना कार्डचा वापर करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *