तुम्ही आहारात ‘या’ गोष्टी खात असाल तर सावधान, चेहऱ्यावर होतो परिणाम!

प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की आपली त्वचा (skin) ही क्लीन आणि क्लीअर असली पाहिजे. त्यासाठी स्त्रीया त्यांच्या स्कीनची खूप काळजी घेत असतात. तसंच बहुतेक स्त्रियांना पिंपल्स, ब्लॅकहेड्स, स्किन ॲलर्जी अशा अनेक अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पण या समस्या प्रदुषण, ॲलर्जी या गोष्टींमुळे होतात असा बहुतेक महिलांचा समज असतो. पण खरं कारण सांगायचं झालं तर स्किनच्या समस्यांसाठी पोषणाचा अभाव मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे.

तुमचा आहार जेवढा हेल्थी आणि चांगला असेल तेवढीच तुमची स्किन चमकदार होते. त्यामुळे प्रथिने, जीवनसत्व असलेले पदार्थ खाल्ल्याने आपल्या चेहऱ्याची चमक वाढण्यास मदत होते. पण साखर असलेले गोड पदार्थ आपल्या स्किनला हानी पोहोचवू शकतात. गोड पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या पडू शकतात, मुरूम फुटू शकतो, स्किन लूज होते अशा समस्या निर्माण होतात. तर आता आपण जास्त गोड पदार्थ खाल्ल्यामुळे स्किनला काय नुकसान होऊ शकते याबाबत जाणून घेणार आहोत.

जर तुम्ही गोड पदार्थ जास्त प्रमाणात खात असाल तर ते आजपासूनच कमी करा. कारण ज्या पदार्थांमध्ये जास्त साखर असते असे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात जळजळ होण्यास सुरुवात होते. त्यामुळे चेहर्‍यावर एक्ने येण्यास सुरुवात होते. तसंच साखर इन्सुलिनची पातळी देखील वाढवू शकते.

जर तुम्ही गोड पदार्थ खाल्ले तर ते ग्लायकेशन प्रक्रिया वाढवू शकते. कारण साखर हे आपल्या स्किनमधील कोलेजन आणि इलास्टिन तंतूंशी जोडली जाते त्यामुळे चेहर्‍यावर सुरकुत्या येतात आणि आपली स्किन लूज होते.

गोड पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढते. त्यामुळे इन्सुलिनचे उत्पादन वाढण्याचा धोका असतो. तर इन्सुलिनची पातळी वाढली तर ती सेबेशियस ग्रंथींना सीबम तयार करण्यास उत्तेजित करू शकते. त्यामुळे आपली स्किन तेलकट होते आणि पिंपल्सचा धोका वाढतो.

जर तुम्हाला तुमची त्वचा (skin) सुंदर आणि चमकदार ठेवायची असेल तर तुमच्या आहारात ताज्या भाज्या, फळे यांचा समावेश करा. तसेच दररोज नारळ पाणी प्या. पालेभाज्या, ड्रायफ्रूट्स, मासे, लिंबूवर्गीय फळे आवर्जून खा यामुळेच तुमची स्किन फ्रेश आणि चमकदार होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *