महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट

बिपरजॉय चक्रीवादळामुळे यंदा मान्सून लांबला होता. जूनचे तीन आठवडे कोरडे गेल्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस (rain) राज्यात दाखल झाला. मात्र, वेळेआधीच मॉन्सूनने देश व्यापला आहे. मधल्या काळात काही वेळ विश्रांती घेऊन पाऊस आता पुन्हा सक्रिय झाला आहे. दरम्यान, पुढील ३ ते ४ दिवस राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी काल (५ जुलै) ट्वीट करून यासंदर्भातील माहिती दिली. पुढील चार ते पास दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे हवामान खात्याचा अंदाज विचारात घेऊनच कामाचं नियोजन करा असं त्यांनी म्हटलं आहे.

मुंबई, महाराष्ट्रासह सध्या देशाच्या बहुतांश भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. दरम्यान गेली चार-पाच दिवस पावसाने (rain) विश्रांती घेतली. काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला तरीही हलक्या सरींनी शहरांना ओलंचिंब केले आहे.

दरम्यान, “भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी पुढील ४ ते ५ दिवसांसाठी तीव्र हमानाचा इशारा जारी केला आहे. पुढील ३ ते ४ दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिवृष्टीचा. खूप दिवसांनी रेड अलर्ट दिसतोय. कृपया भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार योजना करा. काळजी घ्या”, असं ट्वीट होसाळीकर यांनी केलं आहे.

कोकणात ऑरेंज अलर्ट

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणपट्ट्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकणात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस कोसळत असून यापुढेही हवामान खात्याच अंदाज घेऊन कामाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे, सातारा, कोल्हापूर, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नाशिक, पालघर, ठाणे, वर्धा, यवतमाळ, नागपूर, गोंदिया या भागातही येत्या काळात पाऊस जोर धरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *