मुश्रीफ यांना कारवाईपासून दिलासा कायम
संताजी घोरपडे साखर कारखान्यातील कथित फसवणूक प्रकरणात मुरगूड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याशी संबंधित कारवाईची (action) टांगती तलवार असलेल्या राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना तूर्तास दिलासा मिळाला. न्यायमूर्ती नितीन सांब्रे आणि न्यायमूर्ती आर. एम. लड्डा यांच्या खंडपीठाने याचिकेची सुनावणी २२ ऑगस्टला निश्चित केली. तसेच तपास अधिकाऱ्यांना तपासाच्या प्रगत अहवालासह हजर राहण्याचे निर्देश दिले.
मुश्रीफ यांनी ‘ईडी’च्या चौकशीला सामोरे न जाता ‘ईडी’लाच उच्च न्यायालयात खेचले आहे. दरम्यान, मुश्रीफ यांच्या तीन मुलांना विशेष पीएमएलए’ न्यायालयाने ‘ईडी’च्या कारवाईपासून दिलेले संरक्षण कायम ठेवले. विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी पुढील सुनावणीपर्यंत अटकेसारखी कठोर कारवाई (action) करू नये, असे निर्देश दिले.