राजू शेट्टी यांनी खासदार धैर्यशील माने यांच्यावर साधला निशाणा; “कोल्हापूर, सांगलीत…”

(political news) महाराष्ट्रात नवीन ड्रायपोर्टला परवानगी दिली जाणार नसल्याचे ‘जेएनपीए’ने स्पष्ट केल्यामुळे कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील ड्रायपोर्टही होणार नसल्याचे समोर आले आहे.

सांगलीचे भाजपचे खासदार संजय पाटील यांनी मिरजमधील सलगरे येथे, तर कोल्हापुरातील हातकणंगलेचे मिंधे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी मजले येथे ड्रायपोर्ट होणार असल्याचे सांगितले होते. आता या संदर्भात या दोन्ही खासदारांनी काहीच स्पष्टीकरण दिले नसल्याने निवडणुकीच्या तोंडावर भुलभुलय्या दाखवणाऱयांचा फुगा फुटल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

गेल्या वर्षी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात ड्रायपोर्ट देण्याची घोषणा केली होती. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मजले येथे, तर सांगली जिह्यात सलगरे (मिरज) वा रांजणी (कवठे महांकाळ) येथे हे ड्रायपोर्ट होणार असल्याचे या दोन्ही खासदारांकडून गाजावाजा करण्यात येत होता. या ड्रायपोर्टबाबत एका सामाजिक संस्थेने माहिती अधिकारात माहिती घेतली असता, यापैकी कोठेही ड्रायपोर्ट होणार नसल्याची माहिती जवाहरलाल नेहरू पोर्ट ऍथॉरिटीने (जेएनपीए) दिली आहे. (political news)

‘जेएनपीए’च्या माहितीनंतर याबाबत दोन्ही खासदारांनी काहीच स्पष्टीकरण दिले नाही. मजले गावात होणाऱया ड्रायपोर्टला कायमस्वरूपी स्थगिती मिळाल्याने खासदार धैर्यशील माने यांनी नागरिकांची दिशाभूल केल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. यानिमित्ताने राजू शेट्टी यांनी खासदार धैर्यशील माने यांच्यावर निशाणा साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *