जाणून घ्या वयोमानानुसार दर दिवसाला किती प्रमाणात कॅल्शियम-व्हिटॅमीन घेतलं पाहिजे?

आपल्या शरीरासाठी कॅल्शियम (Calcium) आणि व्हिटॅमीन डी ( Vitamin D ) फार गरजेचं असतं. डाएटच्या माध्यमातून आपण कॅल्शियम ( Calcium ) आणि व्हिटॅमीन्स ( Vitamin ) घेतो. अनेकदा यांची कमतरता निर्माण झाली की, डॉक्टर आपल्याला त्याच्या सप्लिमेंट्सबाबत माहिती देतात. शरीरातील हाडे, पेशी, नसा, रक्त, स्नायू आणि हृदयासाठी कॅल्शियम ( Calcium ) अत्यंत आवश्यक आहे.

याशिवााय कॅल्शियमप्रमाणे, व्हिटॅमीन देखील आपल्या शरीरासाठी तितकंच महत्त्वाचं असतं. मात्र व्हिटॅमीन आणि कॅल्शियम किती प्रमाणात घेतलं पाहिजे, याची तुम्हाला कल्पना आहे का? वयोमानानुसार, प्रत्येक व्यक्तीने किती प्रमाणात कॅल्शियम आणि व्हिटॅमीन घेतले पाहिजेत, याची माहिती घेऊया.

या पदार्थांमधून मिळेल तुम्हाला कॅल्शियम ( Calcium )

शरीरासाठी कॅल्शियम मिळवण्याचा उत्तम स्रोत म्हणजे डेअरी प्रोडक्ट्स. दूध, दही आणि पनीर यांसारख्या दुग्धजन्स पदार्थांच्या मार्फत तुम्ही कॅल्शियम मिळवू शकता. त्याचप्रमाणे काही भाज्यांमार्फत देखील तुम्हाला कॅल्शियमची कमतरता भरून काढता येते. यामध्ये पालक, कारळे, पालक, कोबी, भेंडी, कोलार्ड्स, सोयाबीन यांचा समावेश होतो. तसंच बदाम आणि तीळाच्या मार्फत देखील तुम्हाला कॅल्शियम मिळण्यास मदत होते.

व्हिटॅमीन कसं मिळवाल?

व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचं असतं. व्हिटॅमीन डीचा मुख्य स्रोत हा सकाळचं केवळ ऊन मानलं जातं. सूर्यप्रकाशामुळे शरीराला पुरेसे व्हिटॅमिन डी मिळत असलं तरी अनेकदा याची कमतरता निर्माण होते. ते पदार्थांमधून मिळवण्यासाठी, आपण ट्यूना, मॅकेरल आणि सॅल्म हे मासे खावेत. व्हिटॅमिन डी काही दुग्धजन्य पदार्थ, संत्र्याचा रस, सोया आणि दुधात देखील आढळतो. याशिवाय तुम्ही अंड्याचा पांढरा भाग खाऊ शकता.

इंस्टिट्यूट ऑफ मेडिसिननुसार, वयोमानानुसार, कॅल्शियम आणि व्हिटॅमीनचं प्रमाण किती असलं पाहिजे, जाणून घेऊया.

कॅल्शियम

1-3 वर्षांची बालकं : 700 मिलीग्राम (मिलीग्राम)
4-8 वर्षांची मुलं : 1,000 मिलीग्राम
9-18 वर्षांचे तरूण : 1,300 मिलीग्राम
19-50 वर्षांच्या व्यक्ती : 1,000 मिलीग्राम
महिला 51 ते 70 वर्ष: 1,200 मिलीग्राम
पुरुष 51 ते 70 वर्ष: 1,000 मिलीग्राम
महिला आणि पुरुष 71 वर्ष किंवा त्याहून अधिक : 1,200 मिलीग्राम

व्हिटॅमीन डी

वर्ष 1-70 वर्ष : 600 IU
वय 71 आणि त्याहून अधिक : 800 (IU)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *