जडेजाने पीचवर कोहलीला दिला धोका? रागाच्या भरात कोहलीने केलं ‘हे’ कृत्य
(sports news) भारत विरूद्ध वेस्ट इंडिज ( India vs West Indies ) यांच्यामध्ये दुसरा टेस्ट सामना सुरु आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात 438 रन्सवर टीम इंडियाचा ( Team India ) ऑल आऊट झाला. यावेळी भारताकडून स्टार फलंदाज विराट कोहलीने ( Virat Kohli ) उत्तम खेळी केली. त्याने या सामन्यात त्याच्या कारकिर्दीतील 76 वं शतक ठोकलं. मात्र या सामन्यात विराट चांगल्या लयीत दिसत असताना रविंद्र जडेजाने मात्र त्याचा घात केला असल्याचं, चाहत्यांचं म्हणणं आहे.
शतक झळकावल्यानंतर कोहली चांगल्या लयीत दिसत होता. मात्र तो फार विचित्र पद्धतीने रनआऊट झाला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात विराट कोहलीची उत्तम खेळी चाहत्यांना पहायला मिळाली. यावेळी विराट कोहली 121 धावा करून धावबाद झाला.
जडेजाने विराटला दिला धोका?
विराट फलंदाजी करत असताना जोमेल वॅरिकनच्या ओव्हर फेकत होता. यावेली कोहलीने ( Virat Kohli ) लेग साईडने लेन्थ बॉल खेळला आणि नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या जडेजाला रन घेण्यास सांगितलं. जेव्हा कोहलीने रन काढण्याचा कॉल दिला तेव्हा जडेजा खूप पुढे आला होता. यावेळी विराटला धावणं भाग पडले. पण स्क्वेअर लेगच्या जवळून बॉल थेट स्टंप्सना लागला आणि कोहली रनआऊट झाला.
या सामन्यात कोहलीने 206 बॉल्समध्ये 121 रन्स केले. रन आऊट झाल्यानंतर कोहलीने बाऊंड्री लाईनवर बॅट जोरात आदळल्याचं दिसून आलं. (sports news)
सर डॉन बॅडमन यांच्या रेकॉर्डशी बरोबरी
विराट कोहलीचा ( Virat Kohli ) 500 वा सामना होता. हा सामना संस्मरणीय बनवत विराट कोहलीने या सामन्यात शतक झळकावलं. कोहलीच्या टेस्ट कारकिर्दीतील हे २९वं शतक होतं. कोहलीने क्रिकेटच्या इतिहासातील महान फलंदाज मानले जाणारे सर डॉन ब्रॅडमन यांच्या २९ टेस्ट शतकांची बरोबरी केलीये.
शतकानंतर काय म्हणाला विराट?
विदेशी मैदानावर शतक झळकवल्यानंतर विराट कोहली म्हणाला की, “मी घरापासून दूर 15 शतके झळकावली आहेत, हा काही वाईट रेकॉर्ड नाही. मी घरच्या मैदानापेक्षा देशाबाहेर जास्त शतके झळकावली आहेत. मला माझ्या टीमसाठी शक्य तितकं योगदान द्यायचंय. जर मी 50 धावा काढल्या तर असं वाटतं की, माझं शतक हुकलं. 15 वर्षांनंतर या आकड्यांना काही अर्थ उरणार नाही, मी प्रभाव पाडला की नाही हेच त्यांच्या लक्षात राहील.”