पुरग्रस्त भागातील लोकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान (loss) झालं आहे. शेतीचं, पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. उभी पिकं पाण्याखाली गेली आहेत. हाता तोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतला. पिकंच्या पिकं पाण्यात वाहून गेली आहेत. घरांची पडझड झाली आहे. शिवाय घरातलं साहित्य वाहून गेलंय. राहतं घर पाण्याच्या विळख्यात सापडलंय. सर्वसामान्य लोकांचे हाल झालेत. शेतकरी हवालदिल झालाय. अशात सरकारकडून आता आजपासून पंचनामे सुरु करण्यात येणार आहेत.

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आजपासून पुरग्रस्त भागांचे पंचनामे सुरु करण्यात येणार आहेत. तसंच तात्काळ पुरग्रस्तभागातील लोकांना 5 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. तसंच अन्नधान्याचीही मदत सरकार आजपासून करण्यात येणार आहे, अशी माहिती अनिल पाटील यांनी दिली आहे.

जगायचं कसं?

या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठं नुकसान (loss) झालंय. पावसामुळे शेती खरडून गेलीय. अशात पिकांचं नुकसान तर झालंच आहे. पण कसदार शेतीच वाहून गेल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. जगायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतो आहे.

यवतमाळमधील महागावमध्येही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. अशात योगेश नावाच्या युवा शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. त्यांच्या दहा एकर शेतीचं नुकसान झालं आहे. जनावरांना खाण्यासाठी चाराही शिल्लक नाहीये. अशात जनावरांना घेऊन चाऱ्यासाठी वणवण करावी लागत आहे.

“आम्हाला पुरेशी मदत करा”

मुसळधार पावसामुळे राज्यभरात शेतीचं नुकसान झालं आहे. शेतकरी हवालदिल झालाय. शेतीच्या झालेल्या या नुकसानीमुळे जगायचं कसं? असा सवाल शेतकऱ्यापुढे उभा राहिलाय. अशात सरकारने आम्हाला मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी करत आहेत. सरकारने तुटपुंजी मदत करू नये तर भर भक्कम मदत करावी, जेणे करून आम्ही पुन्हा उभं राहू शकू. आमचे संसार वाहून गेलेत. ज्यावर आमचं घर चालतं ती शेती वाहून गेलीय. अशात आम्हाला पुन्हा उभं राहायचं असेल तर आर्थिक मदत गरजेची आहे, असं शेतकरी म्हणत आहेत.

दरम्यान, सध्याही महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडतोय, अशात शेतीचं मोठं नुकसान होतंय. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नदीची पाणी पातळी 39.3 इंचावर पोहचली आहे. जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात अजूनही पावासाची रिमझिम कायम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *