SSC Job: स्टाफ सिलेक्शन अंतर्गत सरकारी नोकरी बंपर भरती सुरु
चांगल्या पगाराची सरकारी नोकरी (job) शोधणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) अंतर्गत बंपर भरती सध्या सुरु आहे. येथे निवड झाल्यास तुम्हाला चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळू शकते. स्टाफ सिलेक्शनच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.पदासाठी लागणारी पात्रता, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
स्टाफ सिलेक्शन अंतर्गत एकूण 1876 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये दिल्ली पोलिस उपनिरीक्षक एक्झिक्युटीव्ह (पुरुष) च्या 109 जागा, दिल्ली पोलिस उपनिरीक्षक एक्झिक्युटीव्ह (महिला) च्या 53 जागा भरल्या जाणार आहेत. तर CAPF मधील उपनिरीक्षक (GD) 1714 जागा भरल्या जाणार आहेत.
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे.
दिल्ली पोलिसांमध्ये उपनिरीक्षक एक्झिक्युटीव्ह (केवळ पुरुष) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी शारीरिक चाचण्या पूर्ण केलेल्या असाव्यात. उमेदवारांकडे मानक चाचण्यांसाठी निश्चित केलेल्या तारखेनुसार LMV (मोटर सायकल आणि कार) साठी वैध ड्रायव्हिंग परवाना असावा.
वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 25 वर्षांदरम्यान असावे.
एससी/एसटी उमेदवारांना 05 वर्षे तर ओबीसी उमेदवारांना 3 वर्षे सवलत देण्यात येणार आहे.
परीक्षा शुल्क
जनरल आणि ओबीसी उमेदवारांना 100 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल. एससी/एसटी/ महिला उमेदवारांना परीक्षा शुल्कात पूर्ण सवलत देण्यात आली आहे.
पगार
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार 35 हजार 400 ते 1 लाख 12 हजार 400 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. पे स्तर 6 नुसार मूळ वेतनाव्यतिरिक्त, उमेदवारांना इतर भत्ते आणि फायदे देखील दिले जाणार आहेत.
निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात नोकरी (job) करावी लागणार आहे.
यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज पाठवायचे आहेत. 15 ऑगस्ट 2023 ही अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख आहे.
शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये भरती
कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे ‘इलेक्ट्रो टेक्निकल (इलेक्ट्रिकल) अधिकारी’ पदाच्या एकूण 30 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे शिप बोर्ड ट्रेनिंगचा किमान 8 महिन्यांचा अनुभव असणे आवश्यक आहे. संस्थेकडून मागण्यात आलेल्या कागदपत्रांची पुर्तता करणे आवश्यक आहे. किंवा उमेदवाराकडे इलेक्ट्रिकल ऑफिसर म्हणून 1 वर्ष काम केल्याचा अनुभव असावा.
1 मार्च 2023 रोजी उमेदवाराचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त नसावे. उमेदवारानी आपले अर्ज fleet.appraisal@sci.co.in यावर पाठवायचे आहेत. उमेदवाराच्या अनुभवानुसार ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलवले जाणार आहे. 30 सप्टेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या.