Chandrayaan-3 मिशनसाठी आजचा 25 जुलै दिवस महत्त्वाचा
10 दिवसापूर्वी म्हणजे 14 जुलैला दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चांद्रयान-3 (Chandrayaan-3) आकाशात झेपावलं. इस्रोने एमव्हीएम-3 रॉकेटच्या माध्यमातून चांद्रयान-3 श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरील दुसऱ्या लॉन्च पॅडवरुन लॉन्च केलं गेलं.
चौथी कक्षा बदलणार
चांद्रयान-3 क्षणोक्षणी चंद्राच्या आणखी जवळ जाताना दिसत आहे. चांद्रयान-३ च्या चौथी कक्षा बदलणार आल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने दिली.
इस्रोने दिली माहिती
यापूर्वी 18 जुलै रोजी चांद्रयान-3 (Chandrayaan-3) च्या तिसऱ्या कक्षेची प्रक्रिया पूर्ण झाली होती. 25 जुलै रोजी चांद्रयान पुढील कक्षेत प्रवेश करेल अशी माहिती इस्रोने दिली आहे.
उत्सुकता शिगेला
चांद्रयान-3 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीयांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
चांद्रयान-3 चं सॉफ्ट लँडिंग
चांद्रयान-3 चं सॉफ्ट लँडिंग 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजून 47 मिनिटांनी करण्याची इस्रोची योजना आहे.
भारताची मान उंचावली
गेल्या 15 वर्षातील इस्रोची तिसरी चंद्र मोहिम आहे. त्यामुळे आता जयगभरात भारताची मान उंचावल्याचं पहायला मिळतंय.