दुपारचे जेवण कधी करावे, १२, १ की २? जाणून घ्या नाश्ता, लंच आणि डिनरची योग्य वेळ

बदलत्या जीवनशैलीचा विपरीत परिणाम आरोग्यावर होत असतो. कामाच्या व्यापात आणि ऑफिसची बदलती वेळ याबरोबर लोकांच्या जेवणाच्या वेळाही बदलत गेल्या आहेत. जेवणाची वेळ सतत बदलल्याने शरिरावर त्याचे परिणाम होतात. त्यामुळं तब्येत बिघडू शकते. इतकंच नव्हे तर, अनेकांना दुपारचे, रात्रीचे जेवणाची (meal) योग्य वेळेच माहिती नसते. आज आपण सकाळचा नाश्का, दुपारचे व रात्रीचे जेवण याची योग्य वेळ जाणून घेऊया.

आजारांचा धोका

बिझी शेड्युलमुळं व कामाच्या व्यापात आपल्याच शरीराकडे आपले दुर्लक्ष होते. भविष्यात यामुळं मोठा धोका निर्माण होण्याआधीच आत्ताच जर सवयीत बदल केला तर आरोग्यासंबंधी समस्या कमी होतात. नाश्ता, लंच आणि डिनर योग्य वेळेत केले नाही तर लठ्ठपणा येण्याची शक्यता असते. आजकाल कमी वयातच अनेकांना वजन वाढण्याच्या तक्रारींना सामोरे जावे लागते. खराब लाइफस्टाइल, वेळी-अवेळी जेवणे यामुळं अनेक आजारांचा धोका निर्माण होतो.

ब्रेकफास्ट कधी करावा

सकाळी झोपेतून उठल्यानंतर तीन तासांच्या आत नाश्ता करावा. म्हणजेच सकाळी 7 ते 9 वाजण्याच्या दरम्यान नाश्ता करावा. यानंतर जर तुम्ही काहीही खाल्लं तरी त्याचे साइड इफेक्ट शरीरावर होतात. त्यामुळं सकाळच्या नाश्त्यामध्ये पोहे, दूध, रोटी, ओट्स, अंडा आणि फायबर-प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे.

लंच कधी करावे

रोगांना दूर पळवायचे असल्यास दुपारचे जेवण (meal) वेळेत जेवावे. जेवण करायची परफेक्ट वेळ जाणून घ्या. नाश्तानंतर पाच तासांनंतर लंच केले पाहिजे. नाहीतर शरीराला नुकसान होण्याची शक्यता असते.

डिनर कधी करावा

रात्री उशीरा डिनर करणे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरु शकते. यामुळं पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम होतो. अनेक आजारांचा धोका संभवतो. त्यामुळं रात्री 7 ते 9 पर्यंत रात्रीचे जेवण केले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *