मा.आमदार विनय कोरे सावकार यांच्याकडून डॉक्टर डी. बी. निर्मळे यांचा सत्कार
पत्रकार नामदेव निर्मळे
सागाव जिल्हा सांगली येथे गावाला लाभलेले देवदूत. ज्यांनी गेल्या 38 वर्षांमध्ये शेकडो रुग्णांना जीवनदान दिले व हजारो रुग्णांना अल्प खर्चामध्ये व अनेकदा स्वतःच्या खिशातील प्रवासाला पैसे देऊन आदर्श आरोग्य सेवा दिली.
डॉ.विनायक वझे यांचे नंतर कोण असा प्रश्न ज्यावेळी सागाव पंचक्रोशीला पटला पडला त्यावेळी परमेश्वरानेच ज्यांना आपल्या मूळ गाव टाकळीवाडी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथून धाडलं ते या गावचे सुपुत्र (doctor) डॉ.डी. बी. निर्मळे यांचा सत्कार डॉ. विनयरावजी कोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यांचा जन्म दिनांक 1 जून 1961 रोजी झाला. शिक्षण एम.बी.बी.एस सन 1984 मध्ये पूर्ण झाले. सागाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सन 1985 मध्ये रुजू झाले. सन 2022 मध्ये सेवानिवृत्त झाले. 1997 मध्ये महाराष्ट्र शासनाकडून राज्यपाल यांच्या हस्ते आदर्श वैद्यकीय अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सन 1995 मध्ये जिल्हा परिषद आदर्श वैद्यकीय अधिकारी पुरस्कार मिळाला होता.
कोरोना काळात कोणत्याही टेस्ट शिवाय तात्काळ निदान करणारे व कोणत्याही विशेष उपकरणाशिवाय 24 तास जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र राबणारे 100% लसीकरणात सिंहाचा वाटा असणारे आरोग्य देवदूत (doctor) डॉक्टर डी.बी. निर्मळे यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायतीला विशेष अभिमान वाटत आहे. टाकळीवाडी गावात त्यांचे कौतुक होत आहे.