ना QR Code ना पिनची झंझट, नवीन फिचरने होईल पेमेंट झटपट

आता तुम्हाला पेमेंट करण्यासाठी क्रेडिट वा डेबिट कार्डची (Debit Credit Card) गरज पडणार नाही. केवळ POS मशीनवर एक टॅप केल्यानंतर सहज पेमेंट होईल. तुमच्या खात्यातून झटपट रक्कम कपात होईल. त्यासाठी क्यूआर कोड स्कॅन (QR Code Scan) करण्याची वा पिन टाकण्याची गरज भासणार नाही. प्लास्टिकच्या क्रेडिट-डेबिट कार्डचा बाजार लवकरच उठणार आहे. डिजिटल पेमेंट मध्ये (Digital Payment) अनेक कल्पक प्रयोग करण्यात येत आहे. पेमेंट सुलभ आणि सुरक्षितरित्या करण्यासाठी संशोधन सुरु आहे. आता नागरिकांना डेबिट, क्रेडिटकार्ड द्वारे ATM मधून पैसे काढण्याची गरज भासणार नाही. तुम्हाला याशिवाय पैसे तर काढता येतीलच पण दुकानावर, मॉलमध्ये सहज आणि सुरक्षितपणे झटपट पेमेंट करता येईल.

असे काढता येतील पैसे

तुम्ही एकदम सहजपणे बोटातील आगठी अथवा एका खास टॅपद्वारे, हातातील स्मार्ट घड्याळाद्वारे पेमेंट करु शकाल. एटीएममधून पण पैसे काढू शकाल. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या इनोव्हेशन युनिट आणि NPCI ने त्यासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. असे अनेक हटके प्रयोग सध्या G-20 Summit च्या भारत मंडपममध्ये दिसत आहे. भारताने आताच विना डेबिट कार्ड ऐटीएमची सुरुवात केली आहे. युपीआय कोड स्कॅन करुन आता लवकरच देशभरात एटीएममधून रक्कम काढता येणार आहे. त्यामुळे डेबिट कार्ड हद्दपार होईल. तर युपीआयवर प्री-अप्रुव्हड लोनची सुविधा आल्याने इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी करता येणार आहे. त्यानंतर ईएमआय पर्याय आल्यास क्रेडिट कार्डची दुकानदारी पूर्णपणे बंद होईल.

परदेशी पाहुण्यांना दाखवली आरबीआयने जादू

भारत मंडपममध्ये जी-20 संमेलनात इनोव्हेशन हब सेंटरमध्ये डिजिटल पेमेंटचे (Digital Payment) अनेक पर्याय दाखविण्यात आले. यामध्ये टॅप अँड पे ही सुविधा दाखविण्यात आली. ही सुविधा नेमकीच सुरु झाली आहे. त्यातंर्गत वापरकर्त्याला 500 रुपयांपर्यंत युपीआय पेमेंट एकदम सहज करता येईल. त्यासाठी त्यांना मोबाईलवरुन QR कोड स्कॅन करण्याची गरज नाही. पिन पण टाकण्याची आवश्यकता नाही. फोनला पीओएस मशीनवर टॅप करुन तुम्ही काही मिनिटात 500 रुपयांपर्यंत पेमेंट करु शकता.

लवकरच बोटातील अंगठी येईल उपयोगी

बोटातील अंगठी अथवा मनगटी घड्याळ पेमेंट मोडवर टॅप करुन तुम्हाला झटपट पेमेंट करता येईल. आरबीआयने ही अनोखी योजना आखली आहे. बँका आता ग्राहकांना यासाठी खास किचन, रिंग उपलब्ध करुन देणार आहे. स्मार्टवॉच कंपन्या पण हे तंत्रज्ञान नव्याने बसवून अशा प्रकारची घड्याळं बाजारात आणत आहेत. पण ही सुविधा रुपे कार्डधारकांसाठी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *