‘बोलून मोकळं व्हाययचं’, म्हणजे….; केसरकरांनी सांगितला व्हायरल व्हिडीओचा अर्थ

मराठा आरक्षणाच्या मुद्दावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काही दिवसांपूर्वीच सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांसोबत एक पत्रकार परिषदघेतली होती. या पत्रकार परिषदेतील एक व्हिडीओ व्हायरल झाला. यावरून सरकारवर टीका करण्यात येत होती. त्यावर आज मंत्री (minister) दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेपूर्वी बोलून मोकळं व्हाययच, त्याला अजित पवार होकार देताना दिसतात. तर देवेंद्र फडणवीस माईक चालू आहे, असं सांगताना दिसून येत होते. त्यावर दीपक केसरकर म्हणाले की, बोलून मोकळं व्हायचं म्हणजे आपण निर्णय घ्यायचा, असं होतं.

(minister) केसरकर पुढं म्हणाले की, आपण निर्णय घ्यायचा म्हणजे कोर्टात टिकेल असा निर्णय घेतला गेला पाहिजे, यासाठी सातत्याने वेळ मागितला जात आहे. आरक्षण आमच्याच फडणवीस सरकारने आणलं. ते १४ महिने टिकलं होतं. सर्वोच्च न्यायालयात ठाकरे सरकार आरक्षणाची बाजू मांडू शकले नाहीत, असा आरोप केसरकर यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *