रोहित शर्माला घ्यावा लागणार मोठा निर्णय; वर्ल्डकपमध्ये ‘ही’ चूक पडू शकते महागात

(sports news) यंदाचा वर्ल्डकप टीम इंडिया जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानली जातेय. 2011 नंतर भारतात वनडे वर्ल्डकप खेळवला जातोय. वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियाची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिलीये. यामध्ये टीम इंडियाने 3 सामने खेळले असून तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. मात्र जर टीम इंडियाला वर्ल्डकप जिंकायचा असेल तर रोहित शर्माला मोठं पाऊल उचलावं लागणार आहे.

टीम इंडियाने या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानसारख्या टीमन्सा पराभूत केलं आहे. या स्पर्धेत टीम इंडियाला अजूनही एकूण 6 सामने खेळायचे आहेत. मात्र यावेळी भारतीय कर्णधार रोहित शर्माला थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. टीम इंडियाचे अनेक खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असून भविष्यात हे खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त राहण्यासाठी काही खेळाडूंना विश्रांती द्यावी लागण्याची शक्यता आहे.

रोहित शर्माला घ्याला लागणार मोठा निर्णय

या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला विजेतेपद मिळवायचं असेल तर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला मोठी पावलं उचलणं गरजेचं आहे. टीम इंडियाचे सर्व खेळाडू सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. पण वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला ग्रुप स्टेजमध्ये 9 सामने खेळायचे आहेत. या सामन्यांमध्ये कोणत्याही खेळाडूला दुखापत झाल्यास ते टीमला याचा मोठा फटका बसणार आहे. यासाठीच रोहित शर्माला ठराविक अंतराने खेळाडूंना विश्रांती द्यावी लागणार आहे. (sports news)

या खेळाडूंना द्यावा लागेल आराम

वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांमध्ये सर्व खेळाडूंची कामगिरी उत्कृष्ट राहिलीये. मात्र कर्णधार रोहित शर्माला टीमचा विकेटकीपर फलंदाज केएल राहुल, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू हार्दिक पांड्याला विश्रांती दिली जाऊ शकते. हे खेळाडू सतत सामने खेळत आहेत. हार्दिक पांड्याला बोटाला दुखापत झालीये मात्र यानंतरही ते विश्वचषकातील सामने खेळत आहेत.

यासाठीच कुठेतरी रोहित शर्माला मोठा निर्णय घेऊन या खेळाडूंना विश्रांती देऊन आगामी मोठ्या सामन्यांसाठी तयार करावं लागणार आहे.

कशी आहे वर्ल्डकपसाठी टीम इंडिया?

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *