विराटची शतकाची हाव भारताला महागात?

(sports news) पुण्यात खेळवण्यात आलेल्या वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेतील भारत विरुद्ध बांगलादेश सामना भारताने जिंकला. विराट कोहलीने झळकावलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने बांगलादेशवर 7 विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यामधील भारताच्या विजयापेक्षा विराट कोहलीने झळकावलेला 48 वं शतकच सर्वाधिक चर्चेच ठरलं. कारण हे शतक विराटने अगदी सामन्यातील शेवटच्या चेंडूवर आपलं शतक अगदी नियोजनपूर्वक पद्धतीने साजरं केलं. एकाच चेंडूवर भारताचा विजय आणि विराटचं शतक असा दुग्धशर्करा योग जुळून आला. मात्र विराटच्या या खेळीवरुन तो स्वार्थी असल्याची टीकाही होत असल्याचं सोशल मीडियावर दिसून आलं. या सामन्यानंतर सेलफीश म्हणजेच स्वार्थी हा शब्द सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र आता विराटच्या या संथ खेळीचा फटका भारतीय संघाला पॉइण्ट्स टेबलमध्ये बसला की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. नेमकं काय म्हटलं जात आहे आणि खरं गणित काय आहे याबद्दल चाहत्यांमध्ये संभ्रम आहे. खरोखरच भारताला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यामध्ये पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावण्याची संधी होती. नेमकं गणित काय आणि घडलं काय पाहूयात…

सध्या पॉइण्ट्स टेबलमध्ये भारत कुठे?

भारताने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात 7 विकेट्स राखून 257 धावांचं टार्गेच 41.3 ओव्हरमध्ये 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मात्र भारताच्या विजयानंतरही भारत पॉइण्ट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानीच राहिला. पहिल्या स्थानी न्यूझीलंडचा संघ आहे. दोन्ही संघांनी आपआपले चारही सामने जिंकले असूनही भारत दुसऱ्या स्थानी तर न्यूझीलंड पहिल्या स्थानी आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे नेट रन रेट. भारताचा नेट रन रेट +1.659 इतका आहे. तर न्यूझीलंडचा नेट रन रेट +1.923 इतका आहे. त्यामुळेच न्यूझीलंड पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियानेही पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर पॉइण्ट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. (sports news)

विराटची संथ खेळी

भारत आणि बांगलादेश सामन्यामध्ये सामन्यामध्ये एकवेळ परिस्थिती अशी आली होती, जेव्हा संघाच्या विजयासाठी आणि विराट कोहलीला ( Virat Kohli ) विजयासाठी 19 रन्सची आवश्यकता होती. यावेळेस विराट आणि के. एल. राहुलमध्ये चर्चा झाली. त्यानंतर केएल राहुल सामना संपेपर्यंत नॉन स्ट्राईकर एण्डलाच होता. यानंतर कोहलीने पुढच्या 15 बॉल्समध्ये भारतीय संघाला जिंकून दिलं. 2 वेळा विराट आणि के. एल. राहुलने अगदी काही अंतरावर चेंडू गेल्यानंतरही 2 धावा काढल्या. अगदी टीम इंडिया जिंकेपर्यंत विराटच स्ट्राइकवर राहिला. विराट आणि के. एल. राहुलने सामन्यातील आवश्यक धावा आणि विराटच्या शतकाचं गणित अगदी परफेक्ट जुळवलं. यासाठी अनेकदा बऱ्याच दूर चेंडू गेल्यानंतरही दोघांनी एक-एक धावा घेणं टाळलं. विराट आणि के. एल राहुल या दोघांनी परस्पर विचाराने केलेल्या या पार्टनरशीपवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. अनेकांनी विराट कोहलीला स्वार्थी म्हटलं आहे. सेल्फीश हा शब्दही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने विराटने अशापद्धतीने शतकासाठी खेळायला हवं होतं की नाही यावरुन वाद सुरु आहे.

…तर भारत असता पहिल्या स्थानी

भारताचा नेट रन रेट जो सध्या +1.659 असला तरी तो याहूनही अधिक असला असता. न्यूझीलंडचा नेट रन रेट +1.923 इतका असला तरी तो भारताला बांगलादेशच्या सामन्यात अधिक सुधारता आला असता. बांगलादेशने दिलेलं टार्गेट भारताने 33 ओव्हरमध्ये पूर्ण केलं असतं तर भारताने नेट रन रेटमध्ये न्यूझीलंडला मागे टाकलं असतं. मात्र ही आकडेवारी खरी असली तरी विराटच्या संथ खेळीमुळे भारताला 33 ओव्हरमध्ये लक्ष्य गाठता आलं नाही असं म्हणणं परिस्थितीजन्य आढावा घेतल्यास चुकीचं ठरेल. 33 ओव्हरनंतर भारताचा स्कोअर 198 वर 3 बाद असा होता. त्यावेळेस विराट कोहली 65 बॉलमध्ये 63 धावांवर खेळत होता. तर के. एल. राहुल 15 बॉलमध्ये 12 धावांवर खेळत होता. म्हणजेच भारत हा लक्ष्यापासून 58 धावा दूर होता. विराटने शतक झळकावण्यासाठीचे प्रयत्न सामन्यातील 39 व्या ओव्हरपासून सुरु केले. जेव्हा भारताला विजयासाठी 19 धावांची गरज होती आणि विराटलाही शतकासाठी 19 धावांची गरज होती. त्यामुळेच विराटने शतकासाठी संथ खेळी केल्याने भारताला फटका बसला असं म्हणणं लॉजिकली चुकीचं ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *