5 विकेट्स घेतल्यावर शमीच्या वक्तव्याने सर्वच हैराण
(sports news) रविवारी वर्ल्डकपमध्ये झालेल्या स्पर्धेत टीम इंडियाने ( Team India ) न्यूझीलंडचा 4 विकेट्सने धुव्वा उडवला. या सामन्यात खरा हिरो ठरला तो गोलंदाज मोहम्मद शमी ( Mohammed Shami ). शमीने त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर तब्बल 5 किवी फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. इतका चांगला खेळ करूनही, आपल्याला टीम बाहेर बसावं लागलं तरीही काही अडचण नसल्याचं वक्तव्य खुद्द मोहम्मद शमीने ( Mohammed Shami ) केलंय. शमीच्या या वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सध्याच्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा हा सलग पाचवा विजय होता. यावेळी या सामन्यात शमीला प्रथमच अंतिम 11 मध्ये संधी मिळाली. टीम इंडियाचा ( Team India ) ऑलराऊंडर आणि उपकर्णधार हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya ) दुखापत झाल्यामुळे मोहम्मद शमी ( Mohammed Shami ) आणि सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) यांचा टीममध्ये समावेश करण्यात आला होता.
मोहम्मद शमीने ( Mohammed Shami ) त्याच्या कारकिर्दीत तिसऱ्यांदा 54 रन्स देत 5 विकेट्स घेतल्या. यावेळी त्याची उत्तम कामगिरी पाहता त्याला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्डही देण्यात आला. न्यूझीलंडच्या 273 रन्सच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना कोहलीच्या खेळीच्या जोरावर भारताने 4 विकेट्सने सामना जिंकला. (sports news)
प्लेईंग 11 मधून ड्रॉप झाल्यावर पहिल्यांदाच बोलला शमी
सामन्यानंतर मोहम्मद शमीच्या ( Mohammed Shami ) म्हणण्यानुसार, दीर्घ काळानंतर टीममध्ये कमबॅक करताना आत्मविश्वास मिळणं आवश्यक आहे. या सामन्याने माझ्यासाठी तेच केलं आहे.
‘टीम इंडिया चांगली कामगिरी करत असेल तर बाहेर बसणं जास्त कठीण नसतं. जेव्हा तुमचे सहकारी चांगला खेळत असतील, तेव्हा तुम्ही त्यांना साथ दिली पाहिजे. जर मी बाहेर असणं जर हे टीमच्या हिताचं असेल तर मला त्यात कोणतीही अडचण नाही, ” असंही शमीने ( Mohammed Shami ) सांगितलंय.
मोहम्मद शमीच्या ( Mohammed Shami ) पाच विकेट्सच्या जोरावर आणि विराट कोहलीच्या मोठ्या अर्धशतकामुळे भारताने रविवारी आयसीसी वर्ल्डकपच्या सामन्यात न्यूझीलंडचा चार विकेट्स राखून पराभव करून सलग पाचवा विजय नोंदवला. या विजयासह भारताने पाच सामन्यातील पाच विजयांसह 10 गुणांसह अव्वलस्थानी आपलं स्थान मजबूत केलंय.