काय आहे ‘इंडिया मोबाईल काँग्रेस’? आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन

आज (27 ऑक्टोबर) पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदींच्या हस्ते सातव्या ‘इंडिया मोबाईल काँग्रेस’चे उद्घाटन होणार आहे. आशियातील हा सर्वात मोठा टेलिकॉम, मीडिया आणि टेक्नॉलॉजी व्यासपीठ आहे. हा कार्यक्रम 27 ते 29 ऑक्टोबर यादरम्यान पार पडेल. आज सकाळी 9:45 वाजता दिल्लीतील ‘भारत मंडपम’मध्ये याचं उद्घाटन होणार आहे.

या परिषदेमध्ये टेलिकम्युनिकेशन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताची प्रगती जगासमोर मांडण्यात येईल. तसंच, या परिषदेमध्ये कित्येक मोठ्या घोषणा होतील. याठिकाणी विविध प्रकारचे स्टार्टअप्स आपले नवनवीन प्रॉडक्ट्स सादर करणार आहेत.

या कार्यक्रमात पंतप्रधान (Prime Minister) मोदी देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये 5G तंत्रज्ञान वापरणाऱ्या 100 प्रयोगशाळांना पुरस्कार देणार आहेत. ‘100 5G लॅब’ या अभियानाअंतर्गत या प्रयोगशाळा तयार करण्यात येत आहेत.

IMC 2023 या परिषदेत 22 देशांचे एक लाखांहून अधिक प्रतिनिधी भाग घेणार आहेत. यामध्ये तब्बल 5,000 हून अधिक CEO स्तराचे प्रतिनिधी असतील. 230 प्रेझेंटर्स आणि 400 हून अधिक स्टार्टअप्स आणि इतर स्टेकहोल्डर्स देखील याठिकाणी असतील.

यावर्षीची थीम

यावर्षीच्या इंडिया मोबाईल काँग्रेसची थीम ‘ग्लोबल डिजिटल इनोव्हेशन’ अशी आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विकासक, निर्माता आणि निर्यातक म्हणून भारताचे स्थान मजबूत करणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे.

या तीन दिवसीय परिषदेमध्ये 5G, 6G, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सारख्या तंत्रज्ञानावर प्रकाश टाकला जाईल. तसंच सेमीकंडक्टर उद्योग, हरित तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा इत्यादींशी संबंधित समस्यांवर चर्चा होणार आहे. यासोबतच नवीन स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी आणि प्रस्थापित उद्योजकांमध्ये परस्पर संबंध वाढवण्यासाठी ‘अस्पायर’ हे अभियान देखील राबवण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *