‘तो’ गगनचुंबी षटकार अन् श्रेयस अय्यरचा विक्रम मिळाला धुळीस

(sports news) धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडियमवर आज न्यूझीलंडविरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा डाव 49.2 षटकात 388 धावांवर संपला. ट्रॅव्हिस हेडने 67 चेंडूत सर्वाधिक 109 धावा केल्या, तर डेव्हिड वॉर्नरने 81 धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्ट आणि ग्लेन फिलिप्सने प्रत्येकी तीन बळी घेतले.

या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने वर्ल्ड कप 2023 मधील सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. मॅक्सवेलने भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरचा विक्रम मोडला आहे. मॅक्सवेल जबरदस्त फॉर्ममधून आहे. मॅक्सवेलने न्यूझीलंडविरुद्ध 24 चेंडूत झटपट 41 धावा केल्या.

शनिवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने 104 मीटर लांब षटकार ठोकला. भारताचा फलंदाज श्रेयस अय्यर सर्वात लांब षटकार मारण्याच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. 2023 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात अय्यरने 101 मीटर लांब षटकार मारला होता.

या यादीत ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या स्थानावर आहे. वॉर्नरने वर्ल्ड कप 2023 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 98 मीटर लांब षटकार मारला होता. (sports news)

या यादीत न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिशेल चौथ्या क्रमांकावर आहे. मिशेलने भारताविरुद्ध 98 मीटर लांब षटकार मारला होता. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलर सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. मिलरने 2023 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत नेदरलँड्सविरुद्ध 95 मीटरमध्ये षटकार मारला होता. मॅक्सवेलने आज न्यूझीलंडविरुद्ध 5 चौकार आणि 2 षटकार मारले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *