पंड्याच्या कमबॅकनंतर ‘या’ खेळाडूला मिळणार डच्चू?

(sports news) सध्या वर्ल्डकप सुरु असून टीम इंजियाची घौडदौड सुरुच आहे. मात्र तरीही टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण लागलेलं दिसतंय. टीमचा उपकर्णधार हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त असून सेमीफायनलच्या सामन्यांसाठी तो उपस्थित राहणार असल्याचं समजतंय. हार्दिकच्या अनुपस्थितीत सू्र्यकुमार यादवला संधी देण्यात आली होती. मात्र आता हार्दिक पंड्या टीममध्ये परत आल्यानंतर कोणाला टीमबाहेर करणार असा प्रश्न उपस्थित होतोय.

वर्ल्डकप 2023 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने उत्तम फलंदाजी केली. त्यामुळे टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आपलं स्थान कायम ठेवू शकतो. सूर्यकुमार यादवच्या खेळीवर कुणालाच शंका नाही. टी-20 फॉरमॅटमध्येही त्याने आपल्या स्फोटक फलंदाजीने आपला दबदबा प्रस्थापित केलाय.

हार्दिंक पंड्याच्या कमबॅकनंतर ‘या’ खेळाडूला मिळणार डच्चू?

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया कठीण परिस्थितीत असताना सूर्याने कर्णधार रोहित शर्मासोबत संयमाने फलंदाजी करत त्याचा बदललेला दृष्टिकोन दाखवून दिला. सूर्यकुमार यादवने या सामन्यात 47 बॉल्समध्ये 49 रन्सची खेळी केली. यावेळी त्याने प्लेईंग इलेव्हनमधील आपलं स्थान मजबूत केले.

मात्र सूर्यकुमार यादवची ही खेळी श्रेयस अय्यरसाठी धोक्याची घंटा समजली जातेय. घोट्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर हार्दिक पांड्या वर्ल्डकपमधील शेवटच्या काही सामन्यांमध्ये कमबॅक करू शकतो.

चौथ्या नंबरवर फलंदाजी करणार के.एल राहुल

टीम इंडियाची माजी सिलेक्टर जतिन परांजपे यांनी सांगितलं की, ‘सूर्या टी-20 मध्ये काय करू शकतो हे आपल्या सर्वांना माहितीये. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात चांगली गोष्ट म्हणजे त्याने परिस्थिती समजून घेतली आणि रोहितच्या उपस्थितीत फलंदाजाला साथ देण्याची भूमिका बजावली. परिस्थितीनुसार त्याची फलंदाजी अव्वल दर्जाची होती.

“आक्रमणाची वेळ आली आहे हे माहीत असतानाच त्याने स्क्वेअरच्या मागे सूर्याने आवडता पिकअप शॉट खेळला. इंग्लंडविरुद्ध त्याने गोलंदाजांचा धैर्याने आणि आत्मविश्वासाने सामना केला. हार्दिक पांड्या टीममध्ये परतल्यास श्रेयसच्या जागी लोकेश राहुल चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो,” असंही परांजपे यांनी म्हटलंय. (sports news)

सूर्यकुमार यादव सहजतेने मोठे शॉट खेळण्यासाठी ओळखला जातो. सूर्याबाबत बोलताना माजी भारतीय विकेटकीपर आणि कॉमेंट्रीटर दीप दास गुप्ता म्हणाले, ‘त्या पीचवर 280 च्या आसपास रन्स काढणं कठीण होईल. प्रतिस्पर्धी टीमला आव्हान देण्यासाठी 240 रन्स पुरेसे असतील याचं आकलन करण्यात तो यशस्वी ठरला. हे लक्षात घेऊन त्याने आपला खेळ बदलला. दुसरीकडे श्रेयस चांगल्या फॉर्ममध्ये दिसत नाहीये. मला विश्वास आहे की सूर्या किंवा हार्दिक यापैकी एकाचा वापर परिस्थितीनुसार पाचव्या आणि सहाव्या स्थानावर केला जाऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *