फुटबॉल दिग्गज लिओनेल मेस्सीने रचला इतिहास

(sports news) फुटबॉल दिग्गज डेव्हिड बेकहॅम यांनी मेस्सीला या हा अवॉर्ड देऊन सन्मानित केलं. अर्जेंटिनासाठी फिफा वर्ल्डकप जिंकणाऱ्या मेस्सीने यापूर्वी 2009, 2010, 2011, 2012, 2015, 2019 आणि 2021 मध्ये बोलन डी’ओर पुरस्कार जिंकलाय.

लिओनेल मेस्सी हा सर्वाधिक वेळा बोलन डी’ओर अवॉर्ड जिंकणारा खेळाडू आहे. मेस्सीनंतर क्रिस्टियानो रोनाल्डो असून त्याचे नावे पाच वेळा हा अवॉर्ड जिंकण्याचा विक्रम आहे. मेस्सी हा बोलन डी’ओर पुरस्कार जिंकणारा पहिला मेजर लीग सॉकर खेळाडू ठरला आहे.

अवॉर्ड स्विकारल्यानंतर मेस्सी म्हणाला, “आम्ही अर्जेंटिनाच्या टीमसोबत मिळून जे काही साध्य केलंय त्याबद्दल हा पुरस्कार आहे. हा अवॉर्ड मी खेळाडू, कोचिंग स्टाफ आणि अर्जेंटिनातील सर्व लोकांना समर्पित करतो. (sports news)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *