प्रसिद्ध अभिनेत्रची मोहम्मद शमीला खुली ऑफर!

(sports news) भारतीय क्रिकेट संघाचा दमदार फलंदाज मोहम्मद शमी याची गोलंदाजी सर्वांनाच माहिती आहे. आपल्या अप्रतिम गोलंदाजीने मोहम्मद शमी याने अनेक विक्रम रचले आहे. वर्ल्डकपमध्ये त्याची अप्रतिम कामगिरी पाहायला मिळत आहे. मोहम्मद शमी त्याच्या खेळीमुळे कायम चर्चेत असतो. पण आता क्रिकेटपटू त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्रीने मोहम्मद शमी याच्यासमोर लग्नासाठी खुली ऑफर ठेवली आहे. ज्यामुळे मोहम्मद शमी चर्चेत आला आहे. अशात मोहम्मद शमी याच्याकडे लग्नाची मागणी करणारी अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल.

अभिनेत्रीने मोहम्मद शमी याच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण अभिनेत्रीने एक अट देखील घातली आहे. मोहम्मद शमी याला लग्नासाठी विचारणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून वादग्रस्त अभिनेत्री पायल घोष आहे.. एक ट्विट करत अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे.

पायल घोष हिने 2 नोव्हेंबर रोजी एक ट्विट केलं होतं. तेव्हा भारताने मैदानात उल्लेखनीय कामगिरी केली. भारताने सामन्यात श्रीलंकेला हारवलं. सामन्यात मोहम्मद शमी याची कामगिरी देखील उल्लेखनीय होती. दरम्यान, सोशल मीडियावर फक्त आणि फक्त पायल घोषचं ट्विट व्हायरल होत आहे.

ट्विट करत पायल म्हणाली, ‘शमी तू इंग्रजी शिक, मी तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी तयार आहे…’ पायल घोष हिने केलेलं ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पायल हिने आणखी एक ट्विट केलं असून, दुसरं ट्विट देखील शमी याच्यासाठीच आहे.

दुसऱ्या ट्विटमध्ये अभिनेत्री म्हणाली, ‘मोहम्मद शमी, उपांत्य फेरीत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी तुला माझ्याकडून कोणत्या प्रकराचं नैतिक समर्थन हवं आहे. आपल्याला सर्वप्रथम फायनलमध्ये स्थान पक्क करायचं आहे, त्यानंतर तुला हिरो झालेलं पाहायचं आहे…’ सध्या सर्वत्र पायल हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. (sports news)

अशात पायल खरंच मोहम्मद शमी याची चाहती आहे की सर्वकाही फक्त प्रसिद्धीसाठी करत आहे? यांसारखे अनेक प्रश्न अभिनेत्रीच्या ट्विटनंतर उपस्थित होत आहेत. पायल घोष याआधी देखील अनेकदा वादग्रस्त प्रकरणांमुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्रीने दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर अभिनेत्री राजकारणात प्रवेश केला. अभिनेत्रीने रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षात प्रवेश केला आहे. पायल सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

मोहम्मद शमी याचं खासगी आयुष्य

मोहम्मद शमी याचं खासगी आयुष्य सध्या तुफान चर्चेत आहे. मोहम्मद शमी याने हसीन जहाँ हिच्यासोबत लग्न केलं होतं, दोघांना एक मुलहा देखील आहे. लग्नानंतर हसीन हिने क्रिकेटरवर अनेक आरोप केले होते. दोघांमधील वाद आजही चर्चेत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *