कोल्हापुरात पहाटेच्या सुमारास भीषण अपघात
कोल्हापुरात (Kolhapur Accident) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडलाय. गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एका खासगी बसचा कोल्हापुरात अपघात (Bus Accident) झालाय. गोव्याहून प्रवाशांना घेऊन मुंबईच्या दिशेने येणारी एक ट्रॅव्हल्स बस शिराळा तालुक्यातील कोकरूड पुलावरून थेट वारणा नदीच्या पात्रात कोसळली. महत्त्वाची बाब म्हणजे या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी (Kolhapur Police) घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. दरम्यान, ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवाशांना दुसऱ्या गाडीतून मुंबईकडे पाठवण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघात (Kolhapur Accident) घडलेल्या बसमध्ये 15 ते 20 प्रवासी होते. हे सर्व प्रवासी गोव्याहून मुंबईच्या दिशेने येत होतो. प्राथमिक माहितीनुसार, चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे म्हटलं जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तुरकवाडी – आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील कोकरूडच्या असणाऱ्या पुलावर हा अपघात घडला. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट वारणा नदीपात्रात कोसळली.
सांगली-कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या शिराळा तालुक्यातील कोकरुड येथील वारणा नदीच्या पुलावरून खाजगी बस थेट नदी पात्राता पडल्याची घटना घडली आहे. मात्र यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. त्याशिवाय कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. गोवा मुंबई प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी लक्झरीला हा अपघात झाला आहे. शिराळ्याच्या दिशेने येत असताना चालकाला अंदाज आला नाही. त्यामुळे बस पुलावर वळण घेण्याऐवजी थेट नदी पात्रात खाली गेली. पण चालकाने गाडीवर नियंत्रण मिळवल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.