World Cup 2023 मध्ये सर्वाधिक शतक क्विंटन डी कॉकच्या नावावर, विराट कितव्या स्थानी?’

(sports news) दक्षिण आफ्रिकाचा स्टार, अनुभवी आणि ओपनर बॅट्समन क्विंटन डी कॉक याचा हा शेवटचा वर्ल्ड कप आहे. क्विंटन वर्ल्ड कपनंतर निवृ्त्त होणार आहे. त्याआधी क्विंटनने 13 व्या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 8 सामन्यांमध्ये 4 शतकांच्या मदतीने 55 धावा केल्या आहेत.

13 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतकांबाबत दुसऱ्या स्थानी न्यूझीलंडचा युवा रचिन रवींद्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. रचिनने 8 सामन्यांमध्ये 3 शतकांसह 523 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल याने 2 शतकं ठोकली आहेत. मॅक्सवेलने 8 सामन्यांमध्ये 397 धावा केल्या आहेत.

टीम इंडियाचा विराट कोहली 2 शतकांसह चौथ्या क्रमांकावर आहे. विराटने 8 सामन्यात 543 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचा रसी वॅन डेर डुसेन याने 8 सामन्यांमध्ये 2 शतकं ठोकली आहेत. रसीने 45.75 सरासरी आणि 90.59 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. (sports news)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *