आता इन्स्टाग्रामप्रमाणे व्हॉट्सअ‍ॅपवरही दिसणार ‘हे’ फीचर

तुम्ही जर इन्स्टाग्राम वापरत असाल, तर स्टोरीज पाहताना मध्ये जाहिराती (advertisement) दिसत असल्याचं तुम्हाला माहिती असेल. असंच फीचर आता व्हॉट्सअ‍ॅपवर देखील येणार असल्याचे संकेत कंपनीचे ब्राझीलमधील प्रमुख विल कॅथकार्ट यांनी दिले आहेत. यासोबतच व्हॉट्सअ‍ॅप चॅनल्सवर व्हॉइस मेसेज आणि स्टिकर फीचर देण्यावरही काम सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

कुठे दिसणार जाहिराती?

व्हॉट्सअ‍ॅपवर ज्या जाहिरातील येतील त्या सुदैवाने तुमच्या इनबॉक्समध्ये दिसणार नाहीत. कॅथकार्ट यांनी सांगितलं, की स्टेटसमध्ये किंवा चॅनल्समध्ये या जाहिराती (advertisement) दिसू शकतात. अर्थात, हे कधीपासून लागू होईल याबाबत विल यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.

यापूर्वी 2019 साली व्हॉट्सअ‍ॅपने एका बीटा व्हर्जनमध्ये स्टेटसमध्ये अ‍ॅड्स दाखवण्याची चाचणी केली होती. मात्र, हे फीचर सर्वांसाठी कधीच लागू केलं गेलं नाही. यावर्षी सप्टेंबर महिन्यात देखील व्हॉट्सअ‍ॅपवर जाहिराती येणार असल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं होतं. मात्र, तेव्हा विल यांनी हे वृत्त फेटाळून लावलं होतं. मात्र आता त्यांनीच याबाबत संकेत दिले आहेत.

चॅनल्समधून करता येणार कमाई

व्हॉट्सअ‍ॅप चॅनल्सच्या माध्यमातून आता कमाई देखील करता येऊ शकणार असल्याचं विल यांनी सांगितलं. हे चॅनल्स सबस्क्रिप्शनसाठी फी लागू करू शकतात. ज्यामुळे केवळ पेड यूजर्सना चॅनल्सचा अ‍ॅक्सेस मिळेल. अर्थात, याबाबत देखील अधिक माहिती देणं विल यांनी टाळलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *