ICC ने जाहीर केली वर्ल्डकपची बेस्ट प्लेइंग इलेव्हन

(sports news) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. सुमारे दीड महिना चाललेल्या या स्पर्धेत दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघातील तब्बल ६ खेळाडूंना या आयसीसीच्या प्लेइंग इलेव्हन आपले स्थान मिळवले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे चॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स यालाच यातून बाहेर ठेवण्यात आले आहे. आयसीसीने रोहित शर्माला प्लेइंग इलेव्हनचा कर्णधार बनवले आहे.

रोहितशिवाय उर्वरित ५ भारतीयांमध्ये विराट कोहली, केएल राहुल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेलॉर्ड कोएत्झी याला १२ वा खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे.

पाकिस्तान-इंग्लंडचा एकही खेळाडू नाही

भारतीयांव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक-ओपनर क्विंटन डी कॉकलाही या प्लेइंग-इलेव्हन मध्ये स्थान मिळाले आहे. तर चॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघातील केवळ दोन खेळाडूंना प्लेइंग-इलेव्हन मध्ये स्थान मिळाले आहे. हे फिरकीपटू अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि फिरकीपटू अॅडम झाम्पा आहे.

याशिवाय न्यूझीलंडच्या डॅरेल मिशेलला मधल्या फळीत स्थान मिळाले आहे. गोलंदाजीत श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंकाची प्लेईंग-इलेव्हन मध्ये निवड झाली आहे. दुसरीकडे, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इंग्लंड, नेदरलँड आणि बांगलादेशच्या एकाही खेळाडूला स्थान देण्यात आले नाही.

आयसीसीने कामगिरीच्या आधारे संघ निवडला

ICC ने या प्लेइंग इलेव्हनमध्ये सर्व खेळाडूंना त्यांच्या कामगिरीच्या आधारे स्थान दिले आहे. यामुळेच २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप-५ खेळाडूंना प्लेइंग इलेव्हन मध्ये स्थान देण्यात आले आहे. अष्टपैलू कामगिरीच्या आधारे जडेजाची निवड करण्यात आली. (sports news)

विश्वचषक २०२३ चे टॉप-5 फलंदाज

विराट कोहली – ७६५ धावा
रोहित शर्मा – ५९७ धावा
क्विंटन डी कॉक – ५९४ धावा
रचिन रवींद्र – ५७८ धावा
डॅरेल मिशेल – ५५२ धावा

वर्ल्ड कप २०२३चे टॉप-5 विकेट घेणारे खेळाडू

मोहम्मद शमी – २४ विकेट
अॅडम झाम्पा – २३ विकेट्स
दिलशान मदुशंका – २१ विकेट्स
जसप्रीत बुमराह – २० विकेट्स
जेराल्ड कोएत्झी – २० विकेट्

आयसीसीची वर्ल्डकप प्लेइंग इलेव्हन

क्विंटन डी कॉक, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, डॅरेल मिशेल, केएल राहुल, ग्लेन मॅक्सवेल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, दिलशान मदुशंका, अॅडम झम्पा आणि मोहम्मद शमी.

१२वा खेळाडू: जेराल्ड कोएत्झी (वेगवान गोलंदाज)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *