व्हॉट्सअपचा वापर करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!

व्हॉट्सअपचा (whatsaapp) वापर करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मेटा कंपनीने WhatsApp चा वापर करणाऱ्यांसाठी नवीन एआय पॉवर्ड चॅटकरीता नवीन शॉर्टकर्ट दिला आहे. सुरुवातीला मार्क झुकरबर्ग यांनी ही सुविधा केवळ बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध असणार आहे. कंपनी लवकरच इतर युजर्ससाठी ही सुविधा उपलब्ध करणार आहे. चला पाहूया एआय पॉवर्ड चॅटबॉटमध्ये काय फिचर पहायला मिळणार आहेत.

व्हॉट्सअपचा नवीन एआय पॉवर्ड चॅटबॉट काय ?

एंड्रोइड व्हर्जन 2.23.24.26 साठी नवीन व्हॉट्सअप बीटामध्ये एक वेगळा शॉर्टकट पहायला मिळणार आहे. युजरला नवीन चॅट सुरु करण्यासाठी एक वेगळा आयकॉन पाहायला मिळणार आहे. तुम्ही या आयकॉनच्या मदतीने हा नवीन शॉर्टकट एआय चॅटमध्ये सरळ प्रवेश करायला मदत करणार आहे. नव्या फिचर आल्याने कॉन्टॅक्ट लीस्टमध्ये नेव्हीगेशनची गरज समाप्त होणार आहे. कंपनीने एका रणनीतीनूसार यास चॅट टॅबमध्ये ठेवले आहे. त्यामुळे युजरला नवीन टूलबाबत चांगल्या प्रकारे माहीती मिळणार आहे.

केव्हापासून सुरु होणार नवा अपडेट

सध्या या नव्या फिचरचे टेस्टर्ससाठी उपलब्ध आहे. कंपनीने अद्याप हे स्पष्ट केलेले नाही की नेमकी ही सुविधा कधी सुरु होईल. WaBetaInfo च्या एका रिपोर्टनूसार जे लोक व्हॉट्सअपच्या बीटा प्रोग्रॅमचा भाग आहेत ते सर्व या नव्या फिचरची टेस्टिंग करु शकतील. आतापर्यंत हे फिचर्स सुरुवातीला व्हाट्सअपच्या पब्लिक व्हर्जनमध्ये आलेले नाही. युजर नेहमी गुगल प्ले स्टोअरवर बीटा प्रोग्रॅम चेक करू शकतात.

व्हॉट्सअपने आणले अनेक जबरदस्त फिचर्स

गेल्याकाही महिन्यात व्हॉट्सअपने (whatsaapp) चॅट लॉक, एक एचडी फोटो ऑप्शन, मॅसेजसाठी एडिटींग बटण, स्क्रीन शेअरिंग सारखे फिचर्स आणले आहेत. हे सर्व व्हॉट्सअपचे महत्वपूर्ण फिचर्स आहेत. जे लोकांसाठी महत्वाचे आहेत. व्हॉट्सअप एका व्हॉट्सअपवर दोन मोबाईल क्रमांक वापरण्याचे फिचर देखील आणत आहे, ही सुविधा सध्या बिटा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *