धोनीनं एका कृतीनं पुन्हा जिंकली चाहत्यांची मनं
(sports news) धोनी देखील आपल्या चाहत्यांसाठी स्वत: पुढाकार घेऊन त्यांची भेट घेताना आपण पाहिलं आहे. धोनीनं आपल्या चाहत्यांशी थेट संवाद साधल्याचा किंवा त्यांची भेट घेण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही एका चाहतीनं धोनीच्या कारचा त्याच्या घरापासून ते अगदी झारखंडच्या विमानतळापर्यंत पाठलाग केला होता. आज चिमुकल्यानं पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांची इच्छा पूर्ण केली. यावेळी धोनीच्या एका एका कृतीनं पुन्हा एका चाहत्यांची मनं जिंकली आहेत. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका चाहत्यानं आपल्या बाईकवर महेंद्रसिंह धोनीची ऑटोग्राफची मागणी केली. महेंद्रसिंह धोनीचं बाइक आणि कारप्रेम कोणापासून लपून राहिलेलं नाही. धोनीकडे त्याच्या पहिल्या आणि स्वस्त बाइकपासून ते सुपरबाइक्स, लग्झरी बाइक्स, लग्झरी क्रूझर बाइक्स आणि विंटेज मोटरसायकल्सचा मोठा खजिना आहे. त्यामुळे धोनीही फॅनला नाही म्हणाला नाही. धोनीनं ऑटोग्राफ तर दिलाच पण यावेळी जी एक कृती केली त्या कृतीनं धोनीनं पुन्हा सगळ्यांची मनं जिंकली.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियात व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक कौतुकाच्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @__krishu___12 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर देत आहेत.(sports news)