हिवाळ्यात परफेक्ट मॉईश्चरायजर कसं निवडायचं?

निरोगी त्वचा (skin) मिळविण्यासाठी, आपल्या त्वचेची योग्य काळजी घेणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. हवामानातही झपाट्याने बदल झाला असून हिवाळा सुरू झाला आहे. अनेकदा थंडीच्या काळात त्वचेतील कोरडेपणा वाढतो आणि त्यामुळे त्वचा नाजूक आणि निर्जीव दिसू लागते.

त्वचेला योग्य पोषण देण्यासाठी, योग्य मॉइश्चरायझर निवडणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हिवाळ्याच्या ऋतूनुसार योग्य प्रमाणात पोषण देऊन तुमची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर निवडण्याच्या काही खास टिप्स सांगणार आहोत.

हिवाळ्यात कोणत्या प्रकारचे टेक्श्चर मॉइश्चरायझर निवडायचे?

हिवाळ्याच्या मोसमात त्वचेचा (skin) टेक्श्चर कोरडा होऊ लागतो आणि त्यासाठी क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर निवडावे. याचे कारण असे की क्रीम आधारित मॉइश्चरायझर्समध्ये मुबलक प्रमाणात तेल असते जे त्वचेला योग्य पोषण देण्याचे काम करते. हिवाळ्याच्या हंगामात, तुम्ही जेल आधारित उत्पादने टाळली पाहिजे कारण ते तेलकट त्वचेसाठी सर्वोत्तम आहेत.

चेहऱ्यावर तुम्ही मध, ग्लिसरीन, एलोवेरा जेल, खोबरेल तेल, कच्चे दूध, ऑलिव्ह ऑईल यासारख्या तेलकट गोष्टींची मदत घेऊ शकता.

दिवसातून किती वेळा मॉइश्चरायझर लावावे?

नार्मल CTM क्लींजिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग बद्दल सांगायचे तर, तुम्ही दिवसातून किमान 3 ते 4 वेळा या स्टेप्स फॉलो केल्या पाहिजे, परंतु जर तुमची त्वचा जास्त कोरडी वाटत असेल तर तुम्ही मॉइश्चरायझर वारंवार वापरत राहा जेणेकरून त्वचा कोरडी होत नाही आणि त्वचा चमकदार दिसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *