विराट टी 20 वर्ल्डकप खेळणार नाही; किंग कोहलीनं BCCI ला काय कळवलं?

(sports news) भारताची रन मशिन विराट कोहलीने नुकत्याच झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा केल्या. मात्र आता हाच विराट कोहली मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून ब्रेक घेणार आहे.

त्याने बीसीसीआयला दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावरील वनडे आणि टी 20 मालिकेत ब्रेक घेणार असल्याचे कळवले आहे. दक्षिण अफ्रिकेचा दौरा 10 डिसेंबरपासून टी 20 मालिकेने सुरू होत आहे.

विराट कोहलीने आपला निर्णय हा बीसीसीआयला कळवला आहे. दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावर भारतीय संघ तीन टी 20 आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. यानंतर ते दोन कसोटी सामने देखील खेळणार आहेत. याबाबतची माहिती द इंडियन एक्सप्रेसने दिली आहे.

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवडसमिती तीनही फॉरमॅटसाठी भारतीय संघाची निवड करणार आहे. काही दिवसातच या संघांची घोषणा होईल. विराट कोहलीसाठी यंदाचा वर्ल्डकप स्वप्नवत राहिला आहे. त्याने 11 डावात 765 धावा ठोकल्या आहेत. त्यात तीन शतकी खेळींचा देखील समावेश आहे. तो वर्ल्डकपचा मालिकावीर देखील ठरला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘विराट कोहलीने (Virat Kohli) त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून ब्रेक हवा असल्याचे बीसीसीआयला कळवले आहे. त्याला ज्यावेळी मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळावं असं वाटेल त्यावेळी तो तसं बीसीसीआयला कळवेल. सध्या घडीला तरी विराट कोहली फक्त कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार आहे.’

विराट कोहली सध्या लंडनमध्ये व्हेकेशनवर गेला आहे. तो गेल्या काही महिन्यापासून सातत्याने क्रिकेट खेळत आहे. विराट कोहलीने वर्ल्कडपपूर्वी सप्टेंबर महिन्यात ब्रेक घेतला होता. त्याच्या जोडीने कर्णधार रोहित शर्माने देखील वर्ल्डकपपूर्वी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात ब्रेक घेतला होता. (sports news)

रोहित बद्दल बोलायचं झालं तर त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटबाबत काय निर्णय घेतला आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वनडे वर्ल्डकपमधील 11 पैकी 10 सामने जिंकले आहेत. तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी उपलब्ध आहे किंवा नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही. तो देखील सध्या युकेमध्ये व्हेकेशनवर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *