रोहित शर्मा पुन्हा सांभाळणार टी-20 च्या कर्णधारपदाची धुरा?

(sports news) ऑस्ट्रेलियानंतर टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेसोबत टी-20 सिरीज खेळायची आहे. या सिरीजसाठी आज टीम इंडियाची घोषणा करण्यात येणार आहे. टीमची घोषणा करण्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) रोहित शर्माला पुन्हा टी-20 टीमची धुरा सांभाळण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

T20 वर्ल्डकप 2022 च्या सेमीफायनल सामन्यात पराभूत झाल्यानंतर, रोहितने T20 फॉर्मेटमध्ये सहभागी होत नव्हता. यापूर्वी बीसीसीआयचे सचिव जय शाह निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांची भेट घेणार आहेत. ज्यामध्ये तिन्ही फॉरमॅटच्या टीम व्यतिरिक्त पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपच्या तयारीवरही चर्चा केली जाणार आहे.

टी-20 च्या कर्णधारपदाची धुरा पुन्हा रोहितकडे सोपवणार?

टी-20 फॉर्मेटचा कर्णधार हार्दिक पंड्याला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे हार्दिक पुढील एक महिना कमबॅक करू शकणार नाही. यावेळी सूर्यकुमार यादवला कर्णधारपदी ठेवण्याशिवाय किंवा रोहितकडे ही जबाबदारी सोपविण्याशिवाय बीसीसीआयकडे पर्याय नाही.

नुकत्याच झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये रोहितने चांगल्या पद्धतीने कर्णधारपद भूषवलं होतं. यानंतर बीसीसीआयने त्याला 2024 मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपपर्यंत खेळण्याची परवानगी देण्यास हरकत नाही.

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली मोठी अपडेट

बीसीसीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार, हार्दिकच्या कमबॅकनंतर काय होणार हा प्रश्न अजूनही कायम आहे. आमचा विश्वास आहे की, जर रोहितने टी-20 ची जबाबदारी स्वीकारली तर तो पुढील टी-20 वर्ल्डकपपर्यंत कर्णधार राहणार आहे. रोहितने सहमती दर्शवली नाही तर दक्षिण आफ्रिकेतील टी-20 सिरीजचं नेतृत्व फक्त सूर्यकुमार करणार आहे. (sports news)

टी-20 वर्ल्डकपची तारीख ठरली

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची सुरूवात येत्या 3 जून रोजी होण्याची शक्यता आहे. तर शेवटचा सामना 30 जून रोजी होईल, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान टीम इंडियाचे कर्णधार कोण होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही? रोहित आणि विराट खेळणार की नाही? यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *