चेहऱ्यावरचा ग्लो कमी होतोय किंवा सुरकुत्या येतायत? तर ‘हे’ ज्यूस नक्कीच प्या

प्रत्येकाला वाटतं की त्याची त्वचा (skin) ही ग्लोइंग असायला हवी. त्यासाठी अनेक डॉक्टर, वर्कआऊट, घरगुती काही ब्यूटी टिप्स आणि त्यासोबत वेगवेगळ्या डिश आपण खातो. पण त्यासाठी खूप कमी लोक आहेत जे काही ज्यूस पितात. त्याचं कारण म्हणजे एकतर ज्यूस करण्यासाठी कंटाळ येतो आणि दुसरं म्हणजे काही फळं अनेकांना आवडतं नाही. पण या सगळ्याकडे दुर्लक्ष करत तुम्ही काही ज्युस पिणं गरजेचं आहे. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला 10 ज्युसचे प्रकार सांगणार आहोत. जर तुम्हाला काही फळं आवडत नसतील तर तुम्ही यापैकी कोणताही एक प्रकार करू शकतात.

हे आहेत ते 10 ज्यूस

गाजर ज्यूस

गाजरामध्ये कॅरोटीनोइड्स, फ्लेव्होनॉइड्स आणि अँटिऑक्सिडंट्सचं आवश्यक पोषक घटक असतात ज्यामुळे त्वचेला फायदा होतो.

अननस ज्यूस

अननस हे फळ खायला जितकं चविष्ट आहे. तितकंच ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. त्याच्या ज्यूसमुळे रक्त प्रवाह आणि रक्ताभिसरण सुधारतं. त्यामुळे त्वचेची पोत सुधारण्यास मदत होते.

कोरफड ज्यूस

कोरफडमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. त्यामुळे त्वचा नॅच्युरली ग्लो करते. अशात आपण किमान आठ दिवसातून एकदा तरी कोरफडचा ज्यूस प्यायला हवा.

संत्री ज्यूस

संत्रीमध्ये व्हिटॅमिन्स मोठ्या प्रमाणात असतात. डॉक्टर देखील अनेकांना व्हिटामीन सी कमी झाल्यास संत्रीचे सेवन करण्याचा सल्ला देतात. त्याशिवाय पेशींच्या नुकसानीच्या दुरुस्तीसाठी देखील उत्तम आहे.

ग्रीन ॲपल ज्यूस

अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सीने भरपूर असलेल्या ग्रीन ॲपल तुमच्या त्वचेला (skin) निरोगी ठेवते. लवकर चेहऱ्यावर रिंकल येत असतील तर नक्कीच या ज्युसचे सेवन करा.

पपई ज्यूस

पपईमध्ये टोमॅटोसारखेच बीटा-कॅरोटीन असतं. आपल्या त्वचेचे संरक्षण करण्यास आणि सनबर्न, त्वचेची लालसरपणा टाळण्यास पपईचा ज्यूस फायदे कारक आहे.

काकडीचा ज्यूस

काकडीत व्हिटॅमिन बी, के आणि बी-6 सारख्या विविध जीवनसत्त्व असतात. त्यात कॅफीक ऍसिड आणि एस्कॉर्बिक ऍसिड देखील आहे. जे त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते.

कलिंगड ज्यूस

कलिंगडचा ज्यूस प्यायल्यानं तुमच्या त्वचेच्या नैसर्गिक आर्द्रतेची पातळी वाढते.

डाळिंब ज्यूस

डाळिंबचा ज्यूसचे सेवन केल्यास रक्त वाढण्यास मदत होते आणि त्वचा चमकदार राहते. त्यात वृद्धलोकांसाठी हा खूप महत्त्वाचा आहे.

बीटरूट ज्यूस

बीटरूट ज्यूसमध्ये भरपूर मॅंगनीज, व्हिटॅमिन सी, फॉलिक ॲसिड, झिंक, आयर्न इत्यादी असतात. त्यामुळे रक्त शुद्ध होते आणि त्वचा चमकदार होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *