नव्या वर्षात व्हॉट्सअॅप युजर्ससाठी गुड न्यूज
भारतातील लाखो मोबाईलधारक दैनंदिन जिवनात व्हॉट्सअॅपचा (WhatsApp) वापर करतात. आपल्या युजर्सना चांगला अनुभव देण्यासाठी व्हॉट्सअॅपदेखील अपडेट देत असते.
खूप फायदा
व्हॉट्सअॅप चॅनलसंदर्भात 4 फीचर्स आणले गेले आहेत. याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. या नव्या फिचर्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
चॅनेल फिचर अपग्रेड
व्हॉट्सअॅपने नुकतेच त्यांचे चॅनेल फिचर अपग्रेड केले आहे. यामुळे ब्रँड, सेलिब्रिटी आणि पब्लीक फिगर्सना त्यांच्या प्रेक्षकांशी जोडणे अधिक चांगले सोपे होणार आहे.
थेट मेसेज
व्हॉट्सअॅप (WhatsApp) चॅनल 2023 वर्षाच्या उत्तरार्धात लाँच करण्यात आले होते. यामुळे यूजर्सच्या त्यांच्या फॉलोअर्सना थेट मेसेज पाठवू शकतात.
4 नवे फिचर
आता मेटा सीईओ मार्क झुकरबर्गने व्हॉट्सअॅप चॅनेलद्वारे चार नवे फिचर जोडले आहेत. याची माहिती आणि होणारे फायदे जाणून घेऊया.
WhatsApp चॅनलची वैशिष्ट्ये
आता चॅनलमधील अॅडमिनला व्हॉइस मेसेज पाठवण्याची सुविधा मिळणार आहे. त्याच्या मदतीने, लोकांना त्यांच्या फॉलोअर्सशी जोडलेले राहणे अधिक चांगले आणि सोपे होईल.