काजू-पनीर मसाला

घटक
30 मिनिटे
५ जण

1-1/4 कप काजू (cashew)
१०० ग्राम पनीर
2 कांदे चिरलेले
3 टोमॅटो
1 मसाला वेलची
3 हिरवी वेलची
2 तेजपत्ता
1 टीस्पून जिरे
5-6 मिरी
3-4 लवंगा
2 दालचिनीच्या काड्या
1 टीस्पून आलं लसूण पेस्ट
1 टीस्पून तिखट
1/4 टीस्पून हळद
1 टीस्पून धनेपावडर
1/2 टीस्पून जिरे पावडर
1/2 टीस्पून गरम मसाला
कसुरी मेथी, कोथिंबीर
1/4 कप फ्रेश क्रीम
चवीनुसार मीठ
तेल, बटर

कुकिंग सूचना

स्टेप 1

पॅनवर तेलात पनीरचे तुकडे तळून घ्या, बाजूला काढा. त्याच पॅनवर ३/४ कप काजू (cashew) फ्राय करून बाजूला काढा. १/२ कप काजूत गरम पाणी ओतून बाजूला ठेवा.

स्टेप 2

कढईत तेल व बटर घालून सर्व खडे मसाले घाला. त्यावर चिरलेला कांदा घालून ब्राउन होईपर्यंत परता, नंतर आलं लसूण पेस्ट व टोमॅटोची पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत परता. आता सर्व मसाले घालून झाकण ठेवून शिजवा.

स्टेप 3

भिजवलेल्या काजूची पेस्ट करून त्यात घाला. मीठ, फ्राय केलेले पनीर, काजू घाला. त्यावर फ्रेश क्रीम फेटून घाला. ५ मिनिटे शिजवा.

स्टेप 4

कसुरी मेथी, कोथिंबीर घाला.
सर्व्ह करा काजू पनीर मसाला…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *