हे आहेत मनुक्याचे प्रकार, जाणून घ्या कोणत्या समस्यांवर कोणते मनुके खावेत

मनुका खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामध्ये विविध प्रकारचे गुणधर्म आढळतात. लोहाची कमतरता असेल तर मनुका (raisins) खाण्याचा सल्ला दिला जातो. पोटाशी संबंधित काही समस्या असतील तरी देखील मनुका खाण्याचा सल्ला दिला जातो. मनुक्यात फायबर आणि काही वेगळ्या जीवनसत्त्वांमुळे तुम्ही ते वेगवेगळ्या परिस्थितीत खाऊ शकता.

1. काळा मनुका

काळा मनुका हा सामान्यतः सर्व घरांमध्ये असतो. हे द्राक्षांपासून तयार केले जातात. सुकल्यानंतर त्याचा रंग गडद होतो. जे खाल्ल्याने केस गळत नाहीत. आपले आतडे स्वच्छ करते आणि त्वचेचे आरोग्य देखील सुधारते.

2. हिरव्या मनुका

हिरवे मनुके पातळ असतात. आकाराने देखील ते लांब असतात. गडद हिरव्या रंगाचे हे मनुके रसाळ असतात. यात फायबर आणि पोषक तत्व भरपूर असतात . जे हृदयासाठी चांगले असतात. ॲनिमियाला प्रतिबंध करण्याचं देखील ते काम करतात. पचनास देखील मदत करतात.

3. लाल मनुका

लाल मनुका हा स्वादिष्ट मनुका (raisins) आहे जो लाल द्राक्षांपासून तयार होतो. हे आकाराने मोठे असतात. मधुमेहाचा धोका कमी करण्यात ते मदत करतात. ते दातांसाठी देखील चांगले असतात. याशिवाय दृष्टी देखील सुधारते.

4. सोनेरी मनुका

थॉम्पसन सीडलेस द्राक्षांपासून खास तयार केलेल्या तुर्की हिरव्या द्राक्षांवरून सुलताना मनुका हे नाव देण्यात आले आहे. हा मनुका रक्तातील साखर नियंत्रित करतो. याशिवाय जळजळ कमी करतो. पचनास देखील मदत करतो.

मनुक्याचे अनेक प्रकार आहेत. फनुका हा फार गोड नसतो. काळ्या रंगाच्या कोरिंथ द्राक्षांपासून तयार केलेले मनुका खाल्ल्याने घसा खवखवणे बंद होते. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. रक्तदाब कमी होतो.

मनुका म्हणजे वाळलेली द्राक्षे असतात. जी द्राक्ष्यापेक्षा आकाराने लहान असतात. मनुका नैसर्गिकरित्या महिलांच्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात. यामुळे बद्धकोष्ठता दूर होते आणि हाडे देखील मजबूत होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *